इनरव्हिल क्लब ऑफ जळगावतर्फे मुक बधिर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
स्वतंत्रदिनाच्या पार्श्वभूमिवर चित्रकला स्पर्धेचे आयोजन रंजन शहा, ज्योती संघवी यांच्या माध्यमातून घेण्यात आली व खाऊ वाटप करण्यात आले.
आवाज मराठी जळगाव, दि. ८ : – इनरव्हिल क्लब ऑफ जळगावतर्फे अपंग सेवा संचालित मूक बधिर विद्यालयामध्ये ४७ च्यावर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. इनर व्हिल क्लब ऑफ जळगावच्या अध्यक्षा उषा जैन, प्रोजेक्ट चेअरमन आबिदा काझी, उज्ज्वला टाटिया, नूतन कक्कड यांच्या सहकार्यातून गणवेश वाटप झाले. स्वतंत्रदिनाच्या पार्श्वभूमिवर चित्रकला स्पर्धेचे आयोजन रंजन शहा, ज्योती संघवी यांच्या माध्यमातून घेण्यात आली व खाऊ वाटप करण्यात आले. सुनीता दमानि यांनी विद्यार्थ्यांना कार्डशिट वाटप केले. चित्रकला स्पर्धेतून प्रथम पाच विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यात अनुक्रमे सुमौन पाखेरा, कौस्तुभराज भोई, पूर्वा चौधरी, दिया पाटील, अहमद रजा या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविले. यावेळी लिला अग्रवाल, दिप्ती अग्रवाल, रश्मी मित्तल, तनुजा मोरे, रोहिणी मोरे, दिशा अग्रवाल, संध्या महाजन, मनिषा सराफ, साधना गांधी, रुची चाँदीवाल,शैला कोचर यांची उपस्थिती होती. उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते १२ वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या दोन विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका निता सोनवणे, शिक्षीका निशात शेख, शिक्षक हेमंत मुंदडा यांनी अध्यक्षा उषा जैन सह क्लबच्या सदस्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी कार्डशिट पेपरचा वापर करुन तिरंगामध्ये कॅप व बॅच तयार केला होता. हेमंत मुंदडा यांनी सुत्रसंचालन केले.