
टीम आवाज मराठी मुंबई प्रतिनिधि | २१ जुलै २०२३ | गेल्या दोन वर्षांपासून मनी लॉन्ड्रींग प्रकरणामध्ये कारागृहात अटकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना शेवटी सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.
भाजपा सरकारमध्ये एकनाथराव खडसे महसूलमंत्री असतांना भोसरी येथील एमआयडीसी मधील भूखंड खरेदी केला होता त्यामध्ये त्यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी आणि सौ मंदाताई एकनाथराव खडसे सहभागी होते. सदरहू या प्रकरणात खडसे यांनी बेकायदेशीपणे हा व्यवहार सुरळीत करण्यासाठी आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप झाला होता.
म्हणून त्यांना त्यावेळी जून २०१६ मध्ये आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला भाग पडले होते त्यानंतर याच प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाच्या तपासात खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने ७ जुलै २०२१ रोजी अटक केली असून ते आजपर्यंत कारागृहात होते. तर एकनाथ खडसे आणि त्यांच्या सौ मंदाताई खडसे यांना जामीन मिळालेला आहे.