जळगाव

जैन इरीगेशन सिस्टिम लि. येथे जैन फूडपार्क व एनर्जी पार्क मध्ये मतदान जनजागृती:-

मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जळगाव जिल्ह्यात शासकीय यंत्रणेमार्फत आणि विविध संस्थांमार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे.

टीम आवाज मराठी जळगाव, दि-9-5-24-मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जळगाव जिल्ह्यात शासकीय यंत्रणेमार्फत आणि विविध संस्थांमार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती होत  आहे.
त्याचप्रमाणे जैन इरीगेशन सिस्टिम लि. च्या जैन फूडपार्क व एनर्जीपार्क मध्ये मतदान जनजागृती करण्यात आली.
गांधी रिसर्च फाउंडेशन चे सहकारी आणि जळगाव जिल्हा लोकसभा २०२४ चे अधिकृत आयकॉन मदन रामनाथ लाठी आणि जळगाव मतदान केंद्रस्तरीय अधिकारी  गिरीश रमनलाल भावसार (बीएलओ) उपस्थित होते.
त्यानंतर जळगाव जिल्हा लोकसभा निवडणूक 2024 चे आयकॉन मदन लाठी यांनी मतदानाचे महत्त्व थोडक्यात पटवून दिले आणि १३ मे रोजी पहिल्या टप्प्यात जास्तीत जास्त मतदान करुन सोबत घरातील सदस्य, आजुबाजुचे शेजारी – पाजारी व नातेवाईकांना विनंती करून जसे आपण उत्सव साजरे करतो त्या प्रमाणे १३ मे २०२४ रोजी हा उत्सव मोठ्या अभिमानाने साजरा करावा हि विनंती करून उपस्थितांना मतदानाची शपथ दिली.
बीएलओ  गिरीश भावसार यांनी आदरणीय जिल्हाधिकारी सरांचे मतदानाविषयी लोकशाहीच्या उत्सवाचे पत्राचे वाचन केले.
त्यानंतर मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदान प्रक्रियेत झालेल्या बदलाची माहिती दिली, मतदार यादीत नाव शोधणे, SMS व ॲपचा वापर करण्या संबंधी सुविधा समजावून सांगितली आणि उपस्थितांचे शंका निरसन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button