जळगाव

परिवर्तन तर्फे अवयवदानासाठी राकेश गावंडे यांचा सत्कार

अवयव दान हे आजच्या काळातलं सर्वश्रेष्ठदान आहे .

टीम आवाज मराठी जळगाव दिनांक 30-4-24-अवयव दान हे आजच्या काळातलं सर्वश्रेष्ठदान आहे . दानाचं महत्त्व आपल्या भारतीय संस्कृतीत अगदी गीतेत सुद्धा अधोरेखित केलेल आहे . या पार्श्वभूमीवर अवयवदान करणं

ही श्रेष्ठ गोष्ट असल्याने परिवर्तन जळगावच्या वतीने आपल्या बहिणीला किडनी दान करणाऱ्या राकेश गावंडे व त्यांच्या पत्नी राही गावंडे यांचा सत्कार करण्यात आला . परिवर्तन प्रेक्षक सभासद योजनेच्या नाटकाच्या मध्यंतरात सकारात्मक गोष्टीचा सन्मान करण्याचा प्रघात आहे , यामुळे चांगल्या गोष्टी अधोरेखित होतात व इतरांना देखील प्रेरणा मिळावी , सकारात्मकता वाढावी हा परिवर्तनचा प्रयत्न आहे .
याच उपक्रमात अमृता साहिर ,इमरोज या नाटकाच्या मध्यंतरात राकेश गावंडे व  राही गावंडे यांचा मानपत्र देऊन सत्कार कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू माहेश्वरी सर आणि मनपाचे उपायुक्त अविनाश गांगुडे यांच्या हस्ते करण्यात आला . याप्रसंगी जे के चव्हाण , डॉक्टर गिरीश सहस्रबुद्धे , धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, समाजकल्याण विभागाचे उपायुक्त योगेश पाटील, आरसी बाफनाचे संपर्क अधिकारी मनोहर पाटील , परिवर्तन चे प्रमुख अनिल कांकरिया अनिश शहा , अमर कुकरेजा , नारायण बाविस्कर , हर्षल पाटील हे प्रमुख उपस्थित होते . मानपत्राचे वाचन संदीप केदार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रतीक्षा कल्पराज यांनी केले .

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button