परिवर्तन संस्था ही आताची जिगीषा आहे – मान्यवरांचा सूर
परिवर्तन जिगीषा सन्मान महोत्सवाचा समारोप
टीम आवाज मराठी जळगाव- वर्तन आयोजित ” परिवर्तन जिगीषा सन्मान महोत्सवात ” समारोपाच्या दिवशी ” प्रवास जिगीषाचा अनुभव आमचा ” या चर्चेच्या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी बोलताना जिगीषा बद्दल मला नेहमीच कुतूहल वाटत आल आहे . मी या कुटुंबाचा भाग झाले. मराठी रंगभूमीच्या इतिहासात जिगीषाच्या कार्याची दखल घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होणार नाही. चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रशांत दळवी यांनी इतिहास निर्माण केला आहे. कादंबरी कदम यांनी आपला अनुभव सांगताना चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासोबत काम करायची इच्छा होती आणि ती चारचौघी नाटकातून पूर्ण झाली. यामुळे शिस्तबद्ध काम करता आले तर पर्ण पेठे यांनी परिवर्तनशी माझा जुना ऋणानुबंध आहे. परिवर्तने जळगाव नाटकाची एक सांगड निर्माण केली आहे. आज पर्यंत मी वेगळ्या धाटणीची नाटक करत आले . अनेकांसोबत काम केलं आमच्या तालमी या शिक्षणाची प्रयोगशाळा होत्या. मुक्ता बर्वे यांनी प्रशांत दळवी आणि चंद्रकांत कुलकर्णी ही मराठी रंगभूमीवरील महत्त्वाची माणसं असल्याचं मत व्यक्त केलं. दळवींचा प्रत्येक शब्द उच्चारण ही एक मजा असून व्यावसायिक नाटक हे त्यांनी धंदा होऊ दिलं नाही. विजिगीषी वृत्ती म्हणजे जिगीषा आहे. चार चौघी बद्दल मला कुतूहल वाटत होतं. प्रचंड ऊर्जा असलेली ही रंगभूमीवरची माणस आहेत, अशा शब्दात त्यांनी गौरव केला. नंदू माधव यांनी परिवर्तन व जिगीषा या संस्थांनी रंगभूमीच्या वाटचालीसाठी कलावंतांसाठी एक वेगळ्या प्रकारची स्पेस, अवकाश निर्माण केला आहे आणि ते ही महत्त्वाची गोष्ट या महोत्सवाच्या निमित्ताने घडून येत आहे अशा शब्दात गौरव केला. याप्रसंगी मंचावर सुदीप्ता सरकार या उपस्थित होत्या. याप्रसंगी सर्व कलावंतांनी विविध विषयांवर आपले अनुभव आणि किस्से याप्रसंगी सांगितले. नाटक ही ऊर्जा देणारी गोष्ट आहे त्यासाठी जळगावत यायला मिळतय आणि परिवर्तनमुळे अशा चर्चेत भाग घेता येतोय याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. सर्व कलावंतांना बोलत करण्याचा काम परिवर्तन अध्यक्ष शंभू पाटील यांनी केलं. या चर्चेला जळगावकर रसिकांनी मोठा प्रतिसाद दिला होता . जिगीषाच्या वतीने परिवर्तन संस्थेचा सन्मानही चंद्रकांत कुलकर्णी यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.