जागतिक महिला दिनानिमित्त अनिताज् फॕशन डिझाईनिंग इस्न्टिट्युट तर्फे महिलांचा सत्कार
टीम आवाज मराठी जळगाव-स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी अनिताज् फॕशन हक्काचे व्यासपिठ - माजी महापौर जयश्री महाजन
जळगाव दि. 8 प्रतिनिधी – अनिताज् फॕशेन डिझाईन इस्न्टिट्युट ला गेल्या 20 ते 25 वर्षांपासून जुळलेले दहा महिलांचा सत्कार करण्यात आला. अनिताज् फॕशन डिझाईनिंग इस्न्टिट्युट मध्ये विविध कोर्स मध्ये सहभागी विद्यार्थ्यांनीना प्रमाणपत्र सुध्दा वाटप करण्यात आले.
कौशल्य विकास शिक्षण मंडळाअंतर्गत मोफत कोर्सचा देखील शुभारंभ करण्यात आला. फॕशन, ब्युटी,मेहेंदी, ज्वेलरी मेकिंग असे विविध सात प्रकारचे हे कोर्स आहेत. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर जयश्री महाजन, गांधी रिसर्च फाऊंडेशन च्या विश्वस्त ज्योती जैन, इंटरनॅशनल ब्युटीशियन डॉ. ज्योती महाजन, फॕशन डिझाईनर आणि फॕशन एज्युकेटर अनिता नांदेडकर, करिश्मा पाटील, गायत्री ठाकूर व्यासपिठावर उपस्थित होते.
अनिताज् डिजाईनिंग इन्स्टीट्युटमध्ये विविध कोर्स
अनिताज् डिजाईनिंग इन्स्टीट्युटमध्ये विविध कोर्स आहेत त्यात फॕशन डिझाईनिंग कोर्समध्ये ब्लाउज व ड्रेस डिझाईन्स, आरी वर्क, वेस्टर्न आऊट फिट ड्रेस, डिप्लोमा व प्रोफेशनल डिप्लोमा इन फॕशन डिझाईन्स, फॕशन सर्व्हिसेस, ब्युटी कोर्समध्ये डिप्लोमा व प्रोफेशनल कोर्स इन ब्युटी पार्लर, हाॕबी कोर्स मध्ये मेहंदी, रांगोळी, पुजाथाली डेकोरेशन, ब्युटी पार्लर सर्व्हिसेस येथे उपलब्ध आहेत असे प्रास्तविक करताना अनिता नांदेडकर यांनी माहिती दिली. सूत्रसंचालन विद्यार्थीनी पुजा अग्रवाल यांनी केले. खुशी निषांद यांनी आभार मानले.
स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी अनिताज् फॕशन हक्काचे व्यासपिठ – माजी महापौर जयश्री महाजन
जागतिक महिलादिनानिमित्त अनिताज् फॕशन तर्फ आयोजित कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांनी व महिलांना मार्गदर्शन माजी महापौर जयश्री महाजन यांनी केले. फॕशन क्षेत्रात करिअरच्या संधी असून आपल्याला मिळालेले शिक्षण हे रोजगार देणारे आहे आपल्यातील कौशल्य हे एखाद्या मोठ्या प्रदर्शनांमध्ये सादर केले तर आणखी संधी मिळतील यातून महिला आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे राहून सामाजिक स्थैर्य राखता येते यासाठी अनिताज् फॕशनचे मोलाचे कार्य असल्याचे जयश्री महाजन म्हणाले.