टीम आवाज मराठी, जळगाव । नोकरी संदर्भ । आपण सुद्धा सरकारी राष्ट्रीयकृत बँकेत जर नोकरीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ या पदाच्या भरतीSatteची अधिसूचना जारी झालेली असून त्यानुसार पात्र उमेदवारांनी एसबीआय च्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०२३ आहे. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officer)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते सुद्धा अर्ज करू शकतात)
वयाची अट : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ०१ एप्रिल २०२३ रोजी २१ ते ३० वर्षे असावे. (अ.जा/अनू. जमाती) : ०५ वर्षे सूट, (इमाव) : ०३ वर्षे सूट
अर्ज शुल्क: सामान्य/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/इमाव: ₹७५०/- (अ.जा/अनू. जमाती/अपंग: फी नाही)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २७ सप्टेंबर २०२३