जी. एच. रायसोनी महाविध्यालयात ‘पिनॅकल’ महोत्सवाचे दोन दिवसीय भव्य आयोजन

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात ‘पिनॅकल’ महोत्सवाचे दोन दिवसीय भव्य आयोजन ; उत्तर महाराष्ट्रातील असंख्य विध्यार्थ्यांचा सहभाग
टीम आवाज मराठी,जळगाव दि. 11 ऑक्टोबर 2024 ;- ‘पिनॅकल” सारखे व्यासपीठ विध्यार्थ्यांसाठी फार महत्वाचे असून आज पाचव्या औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली आहे आणि त्यात एआय, मशीन लर्निग, ब्लॉगचेन टेक्नोलॉजीच्या या जगात टीम बिल्डींग, क्रिएटीव्हीटी, क्रिटीकल थिंकीग, प्रोब्लेम सोल्विंग अॅप्रोच, स्कील डेव्हलपमेट हे विविध स्कील विध्यार्थ्यानी आत्मसात केलेच पाहिजे, आणि हे “‘पिनॅकल” सारख्या विविध इव्हेट्समधूनच शक्य होते असे मत जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी व्यक्त केले.

जळगाव शहरातील स्वायत्त जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात ता. १० व ११ ओक्टोंबर रोजी दोन दिवसीय माहिती, तंत्रज्ञान, संगणक व विज्ञानाशी निगडीत आंतरराष्ट्रीय “पिनॅकल-२०२४” या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राम अँटीव्हायरस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक कल्याण दाणी, लड्ढा क्लासेसचे संचालक अमित लड्ढा, रायसोनी इस्टीट्यूटचे अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व पिनॅकल समन्वयक तसेच एमसीए-बीसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी ‘पिनॅकल’ स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध महाविद्यालयातील विध्यार्थ्यांचे अभिनंदन करत आयोजन कार्यक्रमातील सर्व प्राध्यापक, स्वयंसेवक व विध्यार्थ्याचे कौतुक केले तसेच प्रायोगिक स्तरावरील संकल्पनांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सातत्यपूर्ण संशोधन केले पाहिजे. आजच्या विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते संशोधन न करता नवनिर्मिती करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहिले पाहिजे. तसेच मेक इन इंडियासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सतत इनोव्हेटिव्ह कार्य केले पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी येथे केले.
दोन दिवसीय सुरु असलेल्या या माहिती व तंत्रज्ञानावर आधारित “पिनॅकल-२०२४” आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रश्नमंजुषा, संशोधन पेपर सादरीकरण, मनोरंजन व एकाग्रता वाढविण्यासाठी संगणक गेमिंग, पोस्टर्स प्रेझेंटेशन, सीप्लसप्लस प्रोग्रामिंग स्पर्धा पार पडल्यात. यात आयटी क्विज ७३०, गेमिंग ११०, संशोधन पेपर १८०, पोस्टर्स प्रेझेंटेशन १५० व सीप्लसप्लस प्रोग्रामिंग मध्ये ३८० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. संशोधन विषयात जीएसटी, डिजिटल इंडिया, कॅशलेस सोसायटी, जिओ प्रभाव, आयओटी या प्रमुख विषयांसह आदी विषय सादर करण्यात आलेत.
या महोत्सवाच्या आभार प्रदर्शन कार्यक्रमात एमसीए-बीसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे यांनी नमूद केले कि, विद्यार्थ्यांचे तांत्रिक ज्ञान व ते वापरण्याचे कौशल्य विकसित करण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे खात्रीने एक सकारात्मक बदल झालेला दिसून येईल, जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली “एमसीए-बीसीए”विभागाची हि संकल्पना जी. एच. रायसोनी महाविद्यालयात गेली १७ वर्षापासून राबविण्यात येत असून त्यात कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयातील सुमारे ४०० विध्यार्थ्यानी यावर्षी या महोत्सवात सहभाग नोंदवला हि खरोखर कौतुकास्पद बाब आहे. महाविध्यालयात प्रवेशित विध्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा आधार घेत संशोधन आणि प्रयोगशिलतेद्वारे देशाला प्रगती पथावर नेण्याचे उद्दिष्ट समोर असलेले जी. एच. रायसोनी इस्टीट्युट हे एक व्यापक शिक्षण देणारी संस्था असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. या कार्यक्रमाच्या समारोप कार्यक्रमात बाबा मोटर्सचे संचालक सोहेल मलिक हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद मंधान व लोकेश प्रेम यांनी केले तर स्पर्धा यशस्वितेसाठी पिनॅकल समन्वयक व एमसीए-बीसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे यासहीत प्रा.रुपाली ढाके, प्रा.करिष्मा चौधरी, प्रा.मानसी तळेले,प्रा.हर्षित तलरेजा, प्रा. कविता इंगळे, प्रा. मनीषा राजपूत, प्रा. जयश्री पाटील, प्रा. श्वेता चौधरी, प्रा. विनीत महाजन, प्रा.शुभम आढवाल, प्रा. रिमा मंधान, प्रा. निक्की वेद, प्रा. ज्योती चौधरी यांनी सहकार्य केले.
असा लागला निकाल
आय टी क्विझ या स्पर्धेत प्रथम निखिल अविनाश चौधरी आणि साहिल महेंद्र चौधरी, द्वितीय अनिकेत अविनाश वैद्य व लोकेश बी. पाटील, तृतीय सायली ज्ञानेश्वर सांगोळे आणि प्रणिता एन.गायकवाड, टेक टोक या स्पर्धेत प्रथम कुणाल एस. कनाटे, द्वितीय पायल शिंपी, (युजी) पोस्टर सादरीकरण स्पर्धेत प्रथम ऋतुजा संजय इंगळे, ओम सूर्यकांतसिंग दीक्षित, सलोनी रामचंद्र पाटील, प्रणिता प्रदिप भालेराव, तिशा राजेश चौधरी व सात्विक दीक्षित, द्वितीय तेजल दीपक पाटील, पायल कैलास पवार, लक्ष्मी साहेबराव पाटील, निधी विनोद, तृतीय नयन मिलिंद तायडे तसेच उत्तेजनार्थ रोशन अनिल कुरकुरे, इशान भूपेंद्र अहिरे आणि वरुण चेजारा, (पीजी) पोस्टर सादरीकरण स्पर्धेत प्रथम सागर सुनील पाटील, मयूर सुरेश पाटील व अमोल राजेंद्र वाल्हे, गेमिंग फ्री फायर स्पर्धेत प्रथम मोहित भागवत भावसार, प्रणव तुकाराम कुलकर्णी, पवनकुमार पद्माकर तिडके, करण राजू दांडगे, द्वितीय दुगेश भाऊसाहेब बाविस्कर, प्रणव समाधान पाटील, तेजस शामकांत जैस्वाल, मोहम्मद कुतुबुद्दीन बोहारी, तृतीय परेश सुबोध जोशी, उमंग आनंद बगाडे, यश देविदास महाजन, अनिश सुहास साळी, मिनी मिलिशिया स्पर्धेत प्रथम शुभम श्रीकृष्ण किनगे, द्वितीय पार्थ समीर वैद्य, एनएफएस प्रथम अथर्व दिनेश कुलकर्णी, द्वितीय मोहम्मद अफान व आसिफ पटेल, बीजीएमआय स्पर्धेत प्रथम जर्जिश खान, हुझेफ खान, अबुजार शेख, अयान शेख, द्वितीय प्रणव प्रमोद कोळी, यश प्रमोद कोळी, राहुल नितीन सोनार, नलिन सलीश पाटील, तिसरा अफफान शेख, फैसल पाशा, अब्दुल कादिर, झियान शेख यांना अनुक्रमे स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम या प्रमाणे परितोषिक देण्यात आले. तसेच यावेळी मोस्ट व्हेल्युबल प्लेयर हे पारितोषिक जर्जिश खान व प्रणव तुकाराम कुलकर्णी या विध्यार्थ्याना देण्यात आले
विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया
प्रेरणा अमृतसागर – श्री सुरेशदादा जैन इन्स्टिटयूट, जामनेर
स्पर्धेत खूप काही शिकायला मिळाले. नाविन्यता पूर्वक संकल्पना अभ्यासायला मिळाल्यात. अश्या स्पर्धामुळेच आम्हा विद्यार्थ्यांना गती मिळते. येथील व्यवस्थापन खूप चांगले होते, स्पर्धा अतिशय नियोजनबद्ध झाली.
शिवराज यादव – शासकीय तंत्रनिकेतन महाविध्यालय, जळगाव
पिनॅकल स्पर्धेमुळे आमच्या सारख्या विध्यार्थ्यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळाले, या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या टीमने सृजनशील व आजच्या जगाला उपयोगी पडेल असे प्रात्याक्षिक येथे मांडले होते.