जिगीषाने महाराष्ट्रातील कलावंताना दिशा दिली.
मान्यवरांचा सूर निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि कलावंतांशी संवाद

टीम आवाज मराठी जळगाव-जिगीषाने निर्माण केलेली नाटकं व सिनेमा यांनी एक वलय निर्माण केलं आहे. चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी यांच्या लेखन व दिग्दर्शक जोडगोळीने ज्या कलाकृती मराठी रंगभूमीला दिल्या त्यांनी इतिहास घडवला आहे. असा सुर प्रवास जिगीषाचा आणि अनुभव आमचा या विषयावर चर्चेत जेष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत, वैभव मांगले, नंदू माधव, अभय जोशी यांच्यासोबत मनोहर पाटील, मंगल सानप मंचावर उपस्थित होते. जेष्ठ निवेदिका ज्योती आंबेकर यांनी सर्वांना बोलतं केलं. संवाद साधला. याप्रसंगी अनेक किस्से व नाट्यप्रवासातील गमती जमती कलावंतांनी सांगितल्या. नंदू माधव यांनी जिगीषाचा गौरव करताना रंगभूमीवरील त्यांच्या कार्याचा परिवर्तन जिगीषा सन्मान महोत्सव म्हणजे परिवर्तनने केलेला सन्मान आहे असे प्रतिपादन केले.
परिवर्तन जिगीषा सन्मान महोत्सवात उद्या रविवारी
” प्रवास जिगीषाचा अनुभव आमचा” या विषयावर जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे, कादंबरी कदम, पर्ण पेठे यांच्या सोबत चर्चा आणि गप्पाचा कार्यक्रम सायं 5 वा. रोटरी क्लब हॉल गणपती नगर येथे होणार आहे.