चांदोरकर प्रतिष्ठान तर्फे चैत्र पालवी स्वरोत्सव

जळगाव दि. २9 प्रतिनिधी –चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, प्रभू श्रीरामांचा वनवास संपल्यानंतर अयोध्या प्रवेशाचा दिवस, चैत्र नवरात्रीची सुरुवात होणारा दिवस अर्थात गुढीपाडवा
ह्या वर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान हा स्वरोत्सव साजरा करीत आहे, ओवी ते पसायदानाने स्वरूपात हा कार्यक्रम रविवार दि. ३० मार्च २०२५ रोजी प्रातःकाळी ठीक ६ वाजता महात्मा गांधी उद्यानात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास भवरलाल व कांताबाई जैन फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे. हा कार्यक्रम सादर करणारे कलावंत आहेत, श्रुती जोशी, ऐश्वर्या परदेशी, किरण सोहळे, आणि साथसंगत करतील.
दर्शन गुजराथी (पखवाज)
राहुल कासार (तबला)
राजेंद्र माने (संवादिनी) कार्यक्रमाचे निवेदन प्रीती झारे करणार असून संकल्पना दीपक चांदोरकर यांची आहे. ओवी पसायदान ह्या कार्यक्रमात प्रभाकर कला संगीत अकादमीच्या विद्यार्थिनी दोन मराठी गीतांवर नृत्य सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती
अशोक भाऊ जैन (अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.)
मा. आ. राजुमामा भोळे यांची राहणार आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीस परंपरेप्रमाणे गुढी पाडव्यानिमित्त गुढी पूजन व सूर्य देवतेल अर्घ्य देऊन कार्यक्रमाची सुरुवात होईल. मराठी नवीन वर्षारंभाच्या या प्रातःकालीन सभेस तमाम जळगावकर रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मराठी अभिजात भाषेतून सादर होणाऱ्या विविध गीतांचा व नृत्याविष्काराचा आनंद रसिकांनी घ्यावा व कलावंतांचा उत्साह द्विगुणीत करावा असे आवाहन स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या विश्वस्तांनी तसेच भवरलाल व कांताबाई जैन फाउंडेशनने केले आहे. कार्यक्रम ठीक ६ वाजता सुरू होईल आणि त्याच वेळेस गुढी पूजन करण्यात येईल. रसिकांनी ५.५० पर्यंत आसनस्थ व्हावे. अशीही विनंती प्रतिष्ठान तर्फे करण्यात आली आहे.