जळगाव

बसची दुचाकी स्वारास धडकेत युवक ठार

खोटे नगर जवळील साई पॅलेस येथील घटना

टीम आवाज मराठी जळगाव | १६ ऑगस्ट २०२३ | येथील जळगाव – धुळे राष्ट्रीय महामार्गावरील बांभोरीकडून शहरामध्ये येत असलेल्या दुचाकीस्वाराला हॉटेल साई पॅलेस जवळील महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसने जबर धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना १५ रोजी घडली आहे. याप्रकरणी एसटी बस ड्रायव्हर विरुद्ध जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील द्वारका नगर मधील रहिवासी महेश कुमार पाटील हे त्यांची दुचाकी वाहन क्रमांक एम एच १९ डि.जे.१४०५ ने बांभोरी हुन घराकडे जात असताना एसटी बस क्रमांक एम एच ४०- एन ९८३८ ने संध्याकाळी चार वाजेच्या आसपास धडक दिली या धडकेत महेश कुमार पाटील हे रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर जखमी होऊन ते जागीच ठार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी गणेश दिलीप पाटील व ३९ राहणार स्वामी समर्थ कॉलनी यांच्या फिर्यादीवरून बस चालक आयुब शेख चांद पिंजारी राहणार एरंडोल यांच्याविरुद्ध जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भगवान महाजन करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button