जळगावराज्य

अखेर मंत्री महाजन, गुलाब पाटलांच्या मध्यस्तीने मनपा आयुक्तांवरचा अविश्वास प्रस्ताव भाजप मागे घेणार

आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्यावर आणण्यात आलेला अविश्‍वासाचा  प्रस्ताव उद्या महासभेत मागे

टीम आवाज मराठी जळगाव | ३१ जुलै २०२३ | सध्या जिल्ह्यामध्ये खूपच वादग्रस्त ठरणारी जळगाव महापालिकेमध्ये भाजप, सत्ताधारी शिवसेना (ठाकरे गट), एमआय.एम., शिवसेना शिंदे गटाच्या तब्बल ५६ नगरसेवकांनी महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याविरोधात अविश्‍वास प्रस्ताव सादर केला होता. महापौरांनी त्या प्रस्तावानुसार १ ऑगस्ट रोजी विशेष महासभेचे आयोजन केले होते.  मात्र, भाजप नेते मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, महापालिका आयुक्त विद्या गायकवाड व भाजपच्या नगरसेवकांच्या बैठकीमध्ये चर्चा करून समझोता झाला आहे. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्यावर आणण्यात आलेला अविश्‍वासाचा  प्रस्ताव उद्या महासभेत मागे घेण्यात येणार आहे.

जळगाव महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड या जळगाव महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून रूजू झाल्या होत्या. त्यानंतर त्यांची महापालिकेतच आयुक्तपदावर नियुक्ती शासनाने केली होती. मात्र, काही महिन्यातच त्यांची बदली करून नवीन आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली होती. त्या बदलीविरोधात त्यांनी मॅट मध्ये अर्ज दाखल केला होता. मॅट मध्ये त्यांच्या बाजूने निर्णय लागला व त्यांची आयुक्तपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या पुन्हा नियुक्तीला एक वर्ष झाले नी झाले त्यांच्यावर आता अविश्‍वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या नगरसेवकांनी महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्यावर अविश्‍वास प्रस्ताव सादर केला होता. त्यावर मंगळवारी रोजी मतदान घेण्यात येणार होते. विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट व एम. आय. एमच्या नगरसेवकांनीही पाठिंबा दिला होता. मात्र, राज्यात भाजप, शिंदे गटाची सत्ता असताना व जिल्ह्यात दोन्ही पक्षाचे मंत्री असताना त्यांच्याच नगरसेवकांनी आणलेल्या या प्रस्तावाबाबत राजकीय पडसाद उमटत होते.

मंगळवारी प्रस्तावाच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर आज दिवसभर जोरदार राजकीय खलबते झाली. संध्याकाळी जळगाव येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजप नेते व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत भाजप नगरसेवक तसेच महापालिका आयुक्त यांची संयुक्त बैठक संपन्न झाली. त्यांच्यात समझोता होऊन आयुक्तावरील अविश्‍वास ठराव मागे घेण्याचा निर्णय झाला.  याबाबत माहिती देतांना भाजपचे नेते राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, यांनी सांगितले कि, महापालिका आयुक्त व नगरसेवक यांच्यामध्ये विकासकामांवरून वाद होते. बैठकीत चर्चा झाली. सदर चर्चेत विकासकामाविषयी सुधारणा करण्यास आयुक्तांना सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात विकासाची कामांना गती मिळणार आहेत. या चर्चेमुळेआरोपकर्ते नगरसेवकांचे समाधान झाले असून सदर अविश्‍वासाचा हा प्रस्ताव मागे घेण्यात येणार आहे.  विधानसभा अधिवेशन चालू असल्यामुळे आम्ही त्याठिकाणी होतो, त्याच दरम्यान, नगरसेवक व आयुक्त यांच्यात मतभेद झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती. यापुढे असे कोणत्याही प्रकारचे मतभेद होणार नाहीत असेही मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button