जळगाव

एरंडोल तालुका गुणवत्ता कक्ष समितीची स्थापना विविध विषयांवर चर्चासत्र

समिती अध्यक्ष गटविकास अधिकारी दादाजी जाधव तर सचिव आर डी महाजन

 उमेश महाजन प्रतिनिधि एरंडोल | २० जुलै २०२३ | शासनाच्या धोरणानुसार पंचायत समिती शिक्षण विभागाच्या माध्यमातून एरंडोल तालुका गुणवत्ता कक्ष समितीची स्थापना करण्यात आली . समितीच्या अध्यक्ष पदी गटविकास अधिकारी दादाजी जाधव , सचिवपदी आर डी महाजन तर सदस्य पदी डायट च्या आधिव्याख्याता प्रतिभा भावसार , बालविकास प्रकल्प अधिकारी शैलजा पाटील , विस्तार अधिकारी जे डी पाटील , गट साधन केंद्राचे योगेश कुबडे , गुरुदास शिंपी , आडगाव शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक प्रमोद चिलाणेकर , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष पाटील , बाळू मोरे केंद्रप्रमुख , राजेंद्र मोरे , जयेश अहिरराव , मधुकर देवरे , मनिषा सोनवणे , सुनिल महाजन , अल्लाउदिन शेख , बळीराम सैदाणे , आर एस पाटील , स्वप्निल अमृतकर , संजय मराठे ,समद अली , साहेबराव देशमुख , या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे . यावेळी विदयार्थांच्या गुणवत्ता वाढीसंदर्भात दादाजी जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सभेचे आयोजन करण्यात आले .योवेळी मुख्याध्यापक प्रमोद चिलाणेकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की , तालुक्यात प्रत्येक शाळेत भेटी देऊन साक्षरता अभियान राबवून विदयार्थांना लिहता वाचता करणे गरजेचे आहे . बरेच विदयार्थी वंचित आहे . शाळा व्यवस्थापन समितीचे एस आर पाटील यांनी सांगितले की , प्रत्येक शाळेत शिक्षक पालक सभा होणे , विविध उपक्रम राबवून गुणवत्ता वाढ करणे .आदि विषयांवर चर्चा केली . संजय जमादार यांनी मराठी माध्यमाच्या शाळा टिकविण्यासाठी शिक्षकांना मेहनत घ्यावी . कार्यक्रमाचे प्रास्तावीक गट शिक्षणाधिकारी तथा सचिव आर डी महाजन यांनी केले .समिती उदेश व कार्य केंद्र प्रमुख सदस्य मनिषा सोनवणे यांनी सविस्तर रित्या सांगितले . सुत्रसंचलन अरविंद कडू यांनी केले . यावेळी गट साधन केंद्राचे एल आर पाटील , भगवान ढाके , युवराज पाटील , विजय बडगुजर , भिमराव भालेराव . मंदार वडगावकर , सुनिता डहाके , दिनेश पाटील यांनी परिश्रम् घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button