जळगावक्रीडा

जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या ८ खेळाडूंची ८ व्या महाराष्ट्र राज्य कॅडेट स्पर्धेसाठी निवड

जळगाव दि. ९ प्रतिनिधी :- जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन व जैन स्पोर्टस् अकॅडमी यांच्या वतीने अनुभूती निवासी स्कूल येथे आज कॅडेट (१२ ते १४ वयोगटातील) मुलं आणि मुली निवड चाचणी घेण्यात आली होती. या स्पर्धेत रावेर, बोदवड, जळगाव येथील खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यामध्ये जैन स्पोर्टस् अकॅडमी चे ८ खेळाडूंची १३ ते १५ नोव्हेंबर रोजी अहिल्यानगर येथे होणार असलेल्या ८ व्या महाराष्ट्र राज्य कॅडेट तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. साधना देशमुख, समिक्षा पवार, भाविका पाटील, दिया देशपांडे, शिनय जैन, गुरु कारंडे, मयुर पाटील, अबिर चौबे या जैन स्पोर्टस अॅकडमीच्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

निवड चाचणीसाठी झालेल्या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू : –
मुली : – साधना देशमुख, नम्रता बारी, खुषी बारी, समिक्षा पवार, त्रिशा झिरमाळी, भाविका पाटील, हर्षदा गायकवाड, आकांक्षा कळमकर, दिया देशपांडे, शिनाय जैन
मुलं :- गुरु कारंडे, जयेश गुरचल, पार्थ माळी, सर्वेश पिसे, मयुर पाटील, अर्थव सोनार, पुष्कर पिसे, अबिर चौबे, दुर्गेश गवारे इत्यादी प्रशिक्षक म्हणून जयेश कासार, निकेतन खोडके तर मॅनेजर म्हणून स्नेहल अट्रावलकर यांची निवड करण्यात आली आहे. सदर यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक जयेश बाविस्कर, जयेश कासार, निकेतन खोडके, गिरीश खोडके यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी पंच म्हणून श्रेयांग खेकारे, स्मिता बाविस्कर, जयेश बाविस्कर, आशुतोष सोळंकी, राहुल चव्हाण,दानीश तडवी यांनी सहकार्य केले.
यशस्वी खेळाडूंचे जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, खजिनदार सुरेश खैरनार, सचिव अजित घारगे, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, महेश घारगे, सौरभ चौबे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमी चे अरविंद देशपांडे यांनी कौतुक करून या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
फोटो कॅप्शन –
तायक्वांडो कॅडेट मुलं आणि मुली निवड चाचणीस्पर्धेतील विजेत्यांसोबत (डावीकडून) श्रेयांग खेकारे, निकेतन खोडके, अजित घारगे, अरविंद देशपांंडे, जयेश बाविस्कर, जयेश कासार, स्मिता बाविस्कर-काटकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button