जळगाव

स्व. गोदावरी आई यांना जयंतीनिमित्त वैद्यकीय महाविद्यालयातर्फे आदरांजली

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये गोदावरी आईंच्या कार्याच्या स्मृतीला उजाळा, प्राचार्यांनी वाहील आदरांजली

जळगाव, प्रतिनिधी दिनाक-02-4-2026 :- येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात स्व. गोदावरी आई यांना जयंतीनिमित्त महाविद्यालयातर्फे बुधवारी (१ एप्रिल) आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी गोदावरी आईंच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.

गोदावरी फाउंडेशनच्या प्रेरणास्थान असलेल्या स्व. गोदावरी आई यांच्या जयंतीनिमित्त वैद्यकीय महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गोदावरी आई यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पुष्प अर्पण करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्या कार्याला वंदन करीत स्मृतींना उजाळा देण्यात आला. याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. दीपक अग्रवाल, कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. अनुश्री अग्रवाल, डॉ. चंदन साबळे, डॉ. एम.डी. अब्दुल्ला, डॉ. अलोककुमार यादव, डॉ. रणधीर पांडे, डॉ. योगेश तायडे, डॉ. वैभव पालीवाल, डॉ. नीलेश बेंडाळे, डॉ. पंकजा बेंडाळे यांनी स्व. गोदावरी आई यांच्या पावनस्मृतीस अभिवादन केले. तसेच महाविद्यालयातील वरीष्ठ लिपीक अनंत इंगळे यांच्यासह कार्यालयातील सहकार्‍यांनी देखील आदरांजली अर्पण केली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button