जळगावराज्य

सागर पार्कमध्ये आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा!

जळगाव, आवाज मराठी प्रतिनिधी : जळगाव शहरातील सागर पार्क येथे आज *एल. के. फाऊंडेशनतर्फे भव्य दहीहंडी सोहळ्याचे आयोजन* करण्यात आले आहे. उत्साह, जल्लोष आणि गोविंदा पथकांच्या थरारक सादरीकरणाने हा सोहळा रंगणार असून, जळगावकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या दहीहंडी उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

गोविंदा पथकांच्या थरारक सादरीकरणाची उत्सुकता

दहीहंडी हा केवळ उत्सव नसून एकता, उत्साह आणि सांघिक भावनेचे प्रतीक मानला जातो. सागर पार्क येथे होणाऱ्या या भव्य सोहळ्यात गोविंदा पथकांकडून दहीहंडी फोडण्यासाठी थरारक मानवी मनोरे रचले जाणार आहेत. त्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

एल. के. फाऊंडेशनच्या वतीने जळगाव शहरातील नागरिक, युवक, महिला तसेच कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आज सागर पार्क येथे होणाऱ्या या भव्य दहीहंडी सोहळ्याला जळगावकरांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक ललीत कोल्हे यांनी केले आहे.

उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी जळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दहीहंडी सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन एल. के. फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button