जळगाव

अनुभूती विद्यानिकेतनमध्ये रविवारी दिवाळी मेळा, लहान विद्यार्थी बनणार छोटे उद्योजक

जळगाव, दि. ११ (प्रतिनिधी) –  अनुभूती विद्या निकेतन आणि अनुभूती बाल निकेतनद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. अनुभूती उद्यमिता कार्यक्रमाच्या अंतर्गत रविवारी 12 ऑक्टोबर रोजी ‘दिवाळी मेळा 2025’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जैन इरिगेशन अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अजित जैन, अतुल जैन आणि जैन कुटुंबियांची उपस्थिती असणार आहे.
मेळ्यात मॉन्टेसरी आणि इयत्ता 1 चे विद्यार्थी स्वतः तयार केलेले अन्न पदार्थ, कला आणि हस्तकला उत्पादने सादर करतील. या सर्व तयारी आणि व्यवस्थापनात त्यांना पालकांची साथ लाभणार आहे. ‘दिवाळी मेळा 2025’ कार्यक्रम 12 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 4:00 ते 7:00 वाजे दरम्यान होणार आहे. या उपक्रमाचा उद्देश मुलांमध्ये वित्तीय साक्षरता, सर्जनशीलता आणि उद्यमशील विचारसरणीला प्रोत्साहन देणे आहे.
उपक्रमाचे आयोजन का?
मुलांना विविध कौशल्य आत्मसात करता यावे? या उद्देशाने या दिवाळी मेळाचे आयोजन केले आहे. यामुळे मुलांना योजना बनवणे, पॅकेजिंग करणे, विक्री करणे, ग्राहकांशी संवाद साधणे यासारख्या व्यावहारिक गोष्टी शिकता येणार आहेत. प्रत्येक स्टॉलसाठी स्वतःचा ब्रँड नाव आणि लोगो असणार आहे. जे मुलांनीच तयार केलेले असणार आहे. या उपक्रमामुळे मुलांमध्ये वित्तीय साक्षरता, सर्जनशीलता आणि उद्यमशील विचारसरणीला विकसित होण्यास मदत मिळणार आहे. हा कार्यक्रम मुलांमध्ये सहकार्य, जबाबदारी आणि आत्मविश्वास वाढवणार आहे. 
दिवाळी मेळा आयोजित करण्याबाबत मुख्याध्यापक मनोज परमार यांनी सांगितले की, उद्यमशीलता आणि पैशाची भाषा समजून घेणे ही आजच्या काळाची गरज आहे. मुलांनी उद्यमशीलतेचे मूलभूत तत्त्व समजून घेतल्यास त्यांच्यात सर्जनशील विचार, जबाबदारीची भावना आणि समस्यांचे समाधान करण्याची क्षमता विकसित होते. ही समज मुलांना उद्याचे आत्मविश्वासी नेते बनवेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button