जळगाव

जळगाव येथील आकाश त्रिवेदीची IIT अहमदाबादमध्ये MBA साठी निवड

गुरूवार, दि. १४ / ०४ /२०२५

मा. संपादक
जळगाव.

ॲड. ओम त्रिवेदी
जळगाव
+9194205 58558
_______________

जळगाव, दि. १७ (प्रतिनिधी) जळगाव येथील ॲड. ओम त्रिवेदी आणि गीताव्रती आई सौ. रेखा यांचे ज्येष्ठ पुत्र आकाश यांची निवड भारतातील अत्यंत प्रतिष्ठित संस्था IIM अहमदाबाद मध्ये MBA अभ्यासक्रमासाठी झाली आहे. आकाशने IIT कानपूर येथून B.Tech (Computer Science) पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर MBA प्रवेशाची CAT परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे.

IIM अहमदाबादमध्ये MBA साठी निवड झालेला बहुतेक आकाश हा जळगाव जिल्ह्यातून एकमेव विद्यार्थी आहे. आकाश हा प्राथमिक शाळेतील शिक्षणापासून अव्वल गुणवत्तेत आहे. २०१७ मध्ये तो पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीस पात्र ठरला होता. २०१६ मध्ये तो सहकारी विद्यार्थी सोबत राष्ट्रीयस्तरावरील ‘स्पेल बी’ स्पर्धेत सहभागी झाला होता. २०१७ मध्ये तो IJSO परीक्षेची दुसरी पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाला होता. २०१८ मध्ये केंद्र सरकारची NTSE परीक्षा गुणवत्तेत उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीधारक ठरला होता. २०१९ मध्ये त्याने राष्ट्रीयस्तरावरील KVP परीक्षेत उत्तम गुण मिळवून पुरस्कार पटकावला होता. २०२० मध्ये राष्ट्रीयस्तरावरील JEE Advance परीक्षा राष्ट्रीयस्तरावर २२६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण केली होती. त्यानंतर आकाश IIT कानपूरमध्ये B. Tec (Computer Science) अभ्यासक्रमासाठी पात्र ठरला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button