जैन हायटेक शेतीचा नवा हुंकार जगातील सर्वात्तम कृषिमहोत्सव – डॉ. एच. पी. सिंग
जळगाव दि.१५ प्रतिनिधी – कृषीक्षेत्रातील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषि महोत्सव हे चांगले माध्यम आहे. भारतासह जगात अनेक ठिकाणी महोत्सवाचा शेतकऱ्यांच्या जीवनात बदल आणण्यासाठी प्रभावीपणे वापर केला जातो. त्यातही प्रत्यक्ष अनुभूती देणारे जैन हायटेक शेतीचा नवा हुंकार हे जगातील एकमेव कृषिमहोत्सव आहे. एकाच छताखाली जमिनीच्या मशागती पासून ते काढणी पर्यंत, काढणी पश्चात विक्री व्यवस्था, जल व मृद संधारण, अत्याधुनिक ठिबक सिंचन, फर्टिगेशन पद्धती, जैन ऑटोमेशन, रोपांची निर्मिती व लागवड प्रक्रिया, फ्युचर फार्मिंग म्हणजेच भविष्यातील शेतील, स्मार्ट अॅग्रीकल्चर याबाबत समजेल. शेतकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण करणाऱ्या या महोत्सवात शेतकऱ्यांसह प्रत्येकाने यावे, तंत्रज्ञान बघावे ते आत्मसात करावे आणि प्रसारीत करावे जेणे करून उत्पादकता वाढविता येईल. आधुनिक शेतीचा अवलंब करुन सकारात्मक बदल घडविता येतो असे हॉर्टिकल्चर फलोद्यान माजी आयुक्त तथा भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR)चे माजी डी.जी.जी डॉ.एच.पी.सिंह यांनी केले.
जैन हिल्स वरील कृषी संशोधन प्रात्यक्षिक केंद्रावर सुरू असलेल्या कृषिमहोत्सवाच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या सोबत सौ. बिमला सिंग, जलतज्ज्ञ डॉ. सुधीर भोंगळे, जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. के. बी. पाटील, डॉ. बि. के. यादव, कृषी संशोधन विभागाचे संजय सोन्नजे उपस्थित होते.
हळद, आले, लसूण, कांदा, मिरची या मसाल्यापिकांसह टॉमोटो, बटाटा पिकांसह पपई, केळी, डाळिंब, जैन स्वीट ऑरेंज, संत्रा, पेरू, सिताफल, लिंबू या फळ बागांमध्ये ठिबक व स्प्रिंकलर्स चा वापर यावरही त्यांनी मार्गदर्शन केले. शाश्वत निर्यातक्षम उत्पादन केल्यामुळे योग्य भाव कसा मिळेल यासाठी फक्त मार्गदर्शन नाही तर प्रत्यक्ष सल्ला त्यासाठी तज्ज्ञांची सुयोग्य मार्गदर्शन येथे उपलब्ध आहे. येथील तंत्रज्ञान पहावे, अनुभवावे, आपल्याजवळील काही संशोधणात्मक अनुभव असतील ते एकमेकांना सांगावे व गावांगावामध्ये जावून त्याचा प्रसार करावे असे आवाहनही डॉ. एच. पि. सिंग यांनी केले.
या कृषिमहोत्ससाठी मसाले पिकांचे प्रात्यक्षिक आहे. त्यात हिंग, लवंग, जायफळ, तेजपान, कापूर, कढीपत्ता, दालचिनी, मिरी, आले, हळद, लसुण, कांदा, मिरची, जिरे, धने यांचा समावेश आहे. यामध्ये १९ प्रकाराचे हळद, सात प्रकारचे लसूण आपल्याला पाहता येतील. कमी जागेत, कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन कसे वाढेल यासाठी हा महोत्सव शेतकऱ्यांसाठी चैतन्यदायी ठरेल.