मुंबईत पाऊस हळुवार तर पुण्यासह इतर ५ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
पुण्यासह इतर ५ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
टीम आवाज मराठी, मुंबई | ०४ जुलै २०२३ | महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यानंतर इतरत्र चांगला पाऊस झाला. अशातच आजही हवामान विभागाकडून काही महत्त्वाच्या जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४ दिवस अनेक जिल्ह्यांत ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आला आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या सुरुवातीस पाऊस चांगला बरसेल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, आज रत्नागिरी, रायगड, सातारा, सिंधुदूर्ग आणि कोल्हापूर, या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तर पुणे आणि ठाण्यात हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दोन्ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.