जळगावमुंबईराजकीयराज्य

चोपड्यात बीआरएसच्या मेळाव्यास तेलंगणा येथील मंत्र्यांची उपस्थिती..

नेत्रशिबीरातील ४६० पैकी ७० रूग्णांची मोफत मोतिबिंदु शस्रक्रिया होणार.

टीम आवाज मराठी आत्माराम पाटील प्रतिनिधि चोपडा | २९ जुलै २०२३ | चोपडा येथे भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री ना. के. चंद्रशेखर राव यांच्या प्रेरणेने तालुक्यातील आदिवासी कोळी समाजाचे नेते जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) यांच्या वाढदिवसानिमित्त तेलंगणा राज्याचे अन्नपुरवठा मंत्री ना. रविंदरसिंग यांची चोपड्यात दमदार एन्ट्री झाली. चोपडा येथील नगर परिषद नाट्यगृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. सकाळी १० वाजेपासून सुमारे ४६० रुग्णांची तपासणी करण्यात येऊन त्यापैकी ७० नेत्ररुग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. नेत्रतपासणी डॉ. प्रकाश कोळी व त्यांचे सहकारी यांनी केली. यासाठी नंदुरबार येथील कांतालक्ष्मी नेत्र रुग्णालयाचे सहकार्य लाभत आहे. त्याचदिवशी श्री शिवाजी महाराज चौकात भारत राष्ट्र समिती (बीआरएस) ची शेकडों सदस्याची नोंदणी करण्यात येऊन नाट्यगृहात पक्ष मेळावाही घेण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तेलंगणाचे कॅबिनेट मंत्री ना. रविंदरसिंग यांची प्रमुख उपस्थिती होती. दीपप्रज्वलन बीआरएसचे वरिष्ठ नेते माजी आमदार शंकरअण्णा धोंडगेपाटील तर प्रतिमा पूजन उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख नानासाहेब बच्छाव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांना शाल श्रीफळ फुलहार बुके देऊन यथोचित स्वागत व सत्कार करण्यात आले. स्वागतगीत जय गुरुदेव संगतचे प्रार्थना गायक खंडू महाराज (कोळंबा) यांनी सादर केले. प्रास्ताविक जगन्नाथ बाविस्कर यांनी केले. यावेळी श्री.बाविस्कर यांचा एक्कावन्न किलोचा भला मोठा फुलहार देऊन केक कापून टाळ्यांच्या गजरात वाढदिवस साजरा करण्यात आला. मान्यवरांनी आपल्या मनोगतात तेलंगणा राज्यातील विकास योजनांची माहिती दिली. व जगन्नाथ बाविस्कर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्यात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button