मुक्ताईनगर -सात वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याचा प्रकार तालुक्यातील एका गावात उघडकीस आला असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या सात वर्षीय मुलीला पंधरा वर्षीय मुलाने चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर 15 दिवसांपूर्वी अत्याचार केल्याचा प्रकार घडला होता. तसेच त्या अल्पवयीन मुलाने मुलीला मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर हा अत्याचार केल्याची माहिती पीडित बालिकेने घरच्यांना दिली. याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिल्यावर अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.