विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशिरा 45 उमेदवारांची नावे जाहीर केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून पुन्हा रिंगणात उतरणार आहेत. तर साक्री (अज) विधानसभा मतादरसंघातून श्रीमती मंजुळाताई तुळशीराम गावित, चोपड्यातून चंद्रकांत सोनावणे, जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव पाटील, एरंडोलमधून अमोल पाटील, पाचोऱ्यातून किशोर पाटील, मुक्ताईनगरमधून चंद्रकांत निंबा पाटील, बुलढाण्यातून संजय गायकवाड, मेहकरमधून डॉ. संजय रायमुलकर, दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून अभिजीत अडसूळ हे निवडणूक लढतील.
पुढे रामटेक मतदारसंघातून आशिष जैस्वाल, भंडाऱ्यातून नरेंद्र भोंडेकर, दिग्रसमधून संजय राठोड, नांदेड उत्तरमधून बालाजी कल्याणकर, कळमनुरीमधून संतोष बांगर, जालन्यातून अर्जून पंडितराव खोतकर, सिल्लोडमधून अब्दुल सत्तार, छत्रपती संभाजी नगरमधून प्रदीप जैस्वाल, छत्रपती संभाजी नगर (पश्चिम) मतदारसंघातून संजय शिरसाट, पैठणमधून विलास भूमरे, वैजापूरमधून रमेश बोरनारे, नांदगावमधून सुहास कांदे, मालेगावमधून दादाजी भुसे, ओवळा माजीवडा मतदारसंघातून प्रताप बाबूराव सरनाईक, मागाठाणेमधून प्रकाश सुर्वे, जोगेश्वरी पूर्वमधून मनिषा वायकर, चांदिवली मतदारसंघातून दिलीप लांडे