अमळनेर : तालुक्यातील शहापूर येथील १८ वर्षीय तरुणाने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना १५ रोजी उघडकीस आली आहे. शहापूर येथील भोलेनाथ समाधान भील (वय १८) हा आई, वडिलांसोबत राहून बकऱ्या चारण्याचे काम करत होता. दरम्यान, भोलेनाथ भील याने शहापूर शिवारातील नाल्याकाठी असलेल्या शेतातील
निंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे १५ रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आले. त्यास उतरवून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची। नोंद करण्यात आली आहे. तपास हे. कॉ. देविदास ईशी करत आहेत.