आवाज मराठी जळगाव दि.18-9-24 – नशिराबाद येथील मुळ रहिवाशी व्यापारी,जैन श्री संघाचे सचिव सुरेंद्र बुधमल जैन-कुचेरिया (वय ५९) यांचे आज दि. १८ रोजी पहाटे जळगावमधील सागर पार्क जवळील त्यांच्या निवासस्थानी हृदय विकाराने निधन झाले. त्यांच्यावर नेरीनाका वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, बंधु, भगिनी, मुलगा, मुली, जावई असा परिवार आहे. जयंतीलाल, रविंद्र, अरूण, विजय, महावीर यांचे बंधु व पारस जैन यांचे ते वडील होत. त्यांचा सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग असायचा तसेच दांडगा जनसंपर्क होता.