राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड चाचणीत जयेश सपकाळे व इशा राठोड प्रथम
आवाज मराठी जळगाव 1-9-24 :- जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे १९ वर्षा आतील बुद्धिबळ निवड स्पर्धेचे आयोजन १ सप्टेंबर रविवार रोजी दुपारी १२.०० वाजता करण्यात आले. यातून पहिल्या चार मुली व चार मुले अशा विजयी खेळाडूंची निवड करण्यात आली. कोल्हापूर येथे दिनांक ५ ते ७ सप्टेंबर २०२४ कालावधीत होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघासाठी या खेळाडूंची निवड करण्यात आली.
मुलांच्या वयोगटात – जयेश सपकाळे,तसीन तडवी, आरुष सरोदे, गुणवंत कासार (सर्व जळगाव)
मुलींच्या वयोगटात- इशा राठोड पाचोरा,तनुश्री तायडे, सिद्धी सोनवणे व वृत्ती जाखेटे (सर्व जळगाव)
स्पर्धा कांताई सभागृह येथे संपन्न झाल्या असून जिल्ह्यातील एकूण ४५ खेळाडूंनी सहभाग घेतला.. स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण ठाकरे, अभिषेक जाधव, नथू सोमवंशी, परेश देशपांडे, आकाश धनगर यांनी पंच म्हणून काम केले.
पारितोषिक वितरण
राज्य स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव संजय पाटील, रवींद्र धर्माधिकारी, नथू सोमवंशी, रवींद्र दशपुत्रे यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूना बक्षिसे देण्यात आली.
प्रवीण ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले स्पर्धेत विजयी सर्व खेळाडूंचे अभिनंदन जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदलाल गादिया व पदाधिकारी यांनी केले.