क्रीडाजळगाव

प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली आरडीसी परेडमध्ये अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलची मयुरी महाले

श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या समाजशील दृष्टीकोनातून उभारलेल्या अनुभूती स्कूलमधील मयुरी चंद्रशेखर महाले ही जळगाव जिल्ह्यातील शालेय स्तरावरील एकटीच

जळगाव दि. २५ प्रतिनीधी – येथील अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलची इयत्ता ९ वी ची विद्यार्थीनीची एनसीसी च्या आरडीसी परेडसाठी निवड झाली आहे. दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या आरडीसी परेडच्या सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य प्रकारात जिल्ह्यातून मयूरी महाले ही एकमेव आहे. ती दिल्लीला रवाना झाली असून आपल्या जिल्हावाशीयांसाठी ही गौरवाची बाब आहे.
श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या समाजशील दृष्टीकोनातून उभारलेल्या अनुभूती स्कूलमधील मयुरी चंद्रशेखर महाले ही जळगाव जिल्ह्यातील शालेय स्तरावरील एकटीच आहे. जळगावातून १, अमरावती विभागातून ४ तर पुणे विभागातून ५ असे एकून १० कॅम्प मधून तीची निवड झाली. आरडीसी दिल्ली परेडसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ३१ जण महाविद्यालयीन स्तरावरील आहेत तर ५ विद्यार्थी शालेय स्तरावरील आहेत.
मयूरी हीचे वडील चंद्रशेखर बाबुराव महाले हे विचखेडा ता चोपडा येथील रहिवासी असून ते एका खासगी कंपनीत कंत्राटी कामगार असून मिटर कटआऊट तयार करण्याचे काम करतात. मयूरीची आई त्रिवेणी यांचे शिक्षण बीए झालेले असून महानगर पालिकेत आशा वर्कर म्हणून त्या काम करतात. त्यांना शालेय जीवनात खेळाची आवड होती. कराटे ह्या क्रीडा प्रकारात त्या गोल्ड मेडर तर कबड्डीत जिल्हास्तरावर खेळले आहेत. आईच्या पोलीस भरतीचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मयूरीने एनसीसीला प्रवेश घेतला. अथक परिश्रमातून सातत्यातून आरडीसी परेड साठी निवड झाली याचा आनंद व्यक्त आईने व्यक्त केला. एनसीसी मधून स्वावलंबनाचे धडे मिळतात यातूनच स्वभावात, वागण्यात शिस्त येते याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया मयूरी पालकांनी दिली.
मयूरीच्या यशाबद्दल जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतूल जैन, संचालक सौ. निशा जैन यांनी कौतूक केले. मयूरी महाले हिला शाळेच्या प्राचार्या सौ. रश्मी लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसीचे सीटीओ अरविंद बडगुजर तसेच नृत्याचे प्रशिक्षक ज्ञानेश्वर सोनवणे यांनी काम केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button