जळगाव

कजगाव दरोडा तपासाला गती

भडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

सतीश पाटील, आवाज मराठी भडगाव | ९ ऑक्टोबर २०२३ |  कजगाव तालुका भडगाव येथे गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी राजश्री नितीन देशमुख व ओंकार चव्हाण यांच्या घरावर मध्ये रात्री सात ते आठ जणांनी दरोडा टाकून रोख रक्कम घेऊन पसार झाले होते या यज्ञ घटनेचा तपास चालू असताना कजगाव पारोळा रोडलगत उडान पूल जवळ पोपट अर्जुन चौधरी यांच्या शेतात ते कपाशीला पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांना तिथे बॅग कपडे व अस्तव्यस्त झालेले सामान आढळून आले त्यांनी या घटनेची माहिती गावाचे पोलीस पाटील यांना दिल्यावर पोलीस पाटील यांनी तात्काळ भडगाव पोलीस स्टेशन येथे सदर घटनेची माहिती दिली व गेल्या वीस ते पंचवीस मिनिटात भडगाव पोलीस स्टेशनचे पी ,आय ,श्री चंद्रसेन पालकर हे त्यांच्या ताफ्या सह शेतात दाखल होऊन तात्काळ पंचनामा करून सदर वस्तू ताब्यात घेण्यात आले सदर गुन्ह्याचा तपास युद्ध पातळीवर चालू असून लवकरच गुन्हेगारांना जेरबंदकरू असे श्री चंद्रसेन पालकर यांनी भयभीत झाल्या कुटुंबांना सांगितले , तपासा दरम्यान गाडीच्या चाव्या व काही कपडे हे ओकर चव्हाण यांच्या असल्याचे निष्पन्न झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button