अनिल पाटील | आवाज मराठी कोल्हापूर | दिनांक २९/८/२०२३
कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित महानगरपालिका स्तरीय नेहरू हॉकी स्पर्धा आज मंगळवार दि. २९ रोजी कोल्हापुरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत 15 वर्षांखालील मुलांच्या गटात न्यू हायस्कूल संघ विजयी झाला. तर 17 वर्षाखालील मुलिंच्या गटात प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कुल विजयी झाली. या स्पर्धा 15 वर्षाखालील मुले, 17 वर्षाखालील मुले, 17 वर्षाखालील मुली यांच्यामध्ये घेण्यात आल्या होत्या.
स्पर्धेचा निकाल
15 वर्षाखालील मुले :
पहिला सामना श्री दत्ताबाळ हायस्कूल विरुद्ध विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झाला. हा सामना श्री दत्ताबाळ हायस्कूलने 4-0 गोल’नी जिंकला. दत्ता बाळ हायस्कुलकडून हर्षवर्धन पाटील याने 3 गोल तर विराज पाटील याने 1 गोल केला.
दुसर्या सामन्यात न्यू हायस्कूल विरुद्ध स. म .लोहिया हायस्कूल मध्ये झाला. हा सामना न्यू हायस्कुलने 6-0 गोल’नी जिंकला. न्यू हायस्कुल कडून शिवराज गरले 1, सक्षम पवार 2, प्रथमेश भोसले 2, अमन शेख 1 या प्रमाणे खेळाडूंनी गोल केला.
फायनल सामन्यामध्ये न्यू हायस्कूल विरुद्ध श्री दत्ताबाळ हायस्कूल यांच्यामध्ये सामना झाला. हा सामना न्यू हायस्कूलने 5-0 गोल करीत जिंकला. न्यू हायस्कुल कडून पियुष करडे 2, शिवराज करले 2, प्रथमेश भोसले याने 1 गोल केला.
न्यू हायस्कूल विजयी संघ
आदित्य फल्ले, मुजमील खान, तनिष पुडाळकर, पियुष करडे, उत्कर्ष पाटील, राजवीर दिंडे, शिवराज करले, विराज दामूगडे, अमन शेख, प्रथमेश भोसले, सक्षम पवार, कार्तिक लगरकर, श्री इंगळे, हर्षवर्धन करले, हर्षवर्धन सुतार, क्रीडा शिक्षक सयाजी पाटील, क्रीडा मार्गदर्शक ओंकार भांडवले.
17 वर्षाखालील मुली फायनल सामनाः
प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल विजयविरुद्ध विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यामध्ये झाला. हा सामना प्रिन्सेस पद्माराजे संघाने 5-0 गोल’नी जिंकला. प्रिन्सेस पद्माराजे कडून परिणीता चव्हाण 1, दीक्षा बिल्ले 2, सृष्टी पारगावकर 1 राजनंदिनी तीटवेकर हिने 1 गोल केला.
प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल विजय संघ असाः
पूर्वा करनुरे, आर्या सुतार, सृष्टी पारगावकर, गायत्री गोसावी, श्रेया खराडे, कार्तिकी रजपूत, राजनंदिनी टिटवेकर, सानिका पारगावकर, हर्षदा भालकर, मधुरा भोसले, प्रसिद्धी कांबळे, प्राची कांबळे, परिणीता चव्हाण, दीक्षा बिल्ले, हर्षदा सासवडे, रोहिणी डोंगळे, क्रीडा शिक्षक महेश सूर्यवंशी, क्रीडा मार्गदर्शक श्वेता पाटील.
या स्पर्धेचे नियोजन क्रीडा निरीक्षक सचिन पांडव व स्पर्धा समन्वयक क्रीडा मार्गदर्शक सागर जाधव यांनी केले. पंच म्हणून नजीर मुल्ला, सागर जाधव, योगेश देशपांडे, योगेश माने, ओंकार भांडवले, समीर भोसले कामकाज केले.