देश-विदेशनंदुरबारराज्य

मुंबईच्या ‘गिरीषा पै’, ‘लक्ष दिघे’ यांना अजिंक्यपद तर नंदुरबारची ‘नारायणी मराठे’, नागपुरचा ‘स्वराज मिश्रा’ यांना उपविजेतेपद

कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य सात वर्षाखालील मुलं मुलिंच्या बुद्धीबळ निवड स्पर्धा उत्साहात

अनिल पाटील | आवाज मराठी कोल्हापूर | दिनांक २९/८/२०२३

पोद्दार इंटरनॅशनल स्कुल, नवा वाशी नाका, कोल्हापूर येथे चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या सात वर्षाखालील मुला मुलींच्या महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा आज मंगळवार दि. २९ रोजी संपन्न झाल्या.

अंतिम आठव्या फेरीमध्ये मुलांच्या गटात पहिल्या पटावर आघाडीवर असलेल्या नागपूरच्या स्वराज मिश्राने ठाण्याच्या दर्श राऊतला पराभूत केले. तर दुसऱ्या पटावर आघाडीवर असलेल्या मुंबईच्या लक्ष दिघेने नागपुरच्या अर्णव कुंचलवार वर मात केली. विजयी झालेल्या लक्ष दिघे व स्वराज मिश्रा या दोघांचे समान साडेसात गुण झाल्यामुळे बुकोल्स टायब्रेक गुणानुसार लक्षला अजिंक्यपद मिळाले. तर स्वराज्यला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. लक्षला रोख दोन हजार रुपये, चषक तर स्वराज्यला रोख पंधराशे रुपये, चषक देऊन सन्मानित करण्यात आले. 


मुलींच्या गटात पहिल्या पटावर सात गुणासह आघाडीवर असलेल्या मुंबईच्या गिरीषा पै या खेळाडूने साता-याच्या रिवा चरणकर वर मात करीत आठ गुणासह निर्विवादपणे अजिंक्यपद पटकाविले. गिरीषाला रोख दोन हजार रुपये, चषक देऊन गौरविण्यात आले. दुसऱ्या पटावर अग्रमानांकित नंदुरबारच्या नारायणी मराठे ने औरंगाबादच्या स्वरा लढ्ढावर विजय मिळवला व सात गुणांसह उपविजेतेपद पटकाविले. तिला रोख पंधराशे रुपये, चषक देऊन सन्मानित करण्यात आले. आयुर्विमा महामंडळ, अयोध्या फाऊंडेशन, बँक ऑफ महाराष्ट्र व एस्,बी.रिसेलर्स यांनी या स्पर्धा पुरस्कृत केल्या होत्या.

या स्पर्धेतून खालील दोन मुलांची व तीन मुलींची निवड सात वर्षाखालील राष्ट्रीय निवड बुद्धिबळ स्प्रर्धेत करण्यात आली आहे. सात वर्षाखालील राष्ट्रीय निवड बुद्धिबळ स्पर्धा दि. 21 ते 25 सप्टेंबर दरम्यान कलकत्ता येथे होणार आहेत.

विजयी मुले :- लक्ष दिघे मुंबई, स्वराज मिश्रा नागपूर

विजयी मुली :- गिरीषा पै मुंबई, नारायणी मराठे नंदुरबार, नित्या बंग मुंबई

मुले व मुलींच्या दोन्ही गटात पहिल्या 10 क्रमांकांना रोख बक्षिसे व चषक देण्यात आला. यात विहान शहा पुणे, कृष्णा मुरकुटे नागपूर, ओम गाणू मुंबई, नोवा अय्यर जुएल, हेयान रेड्डी पुणे, प्रज्ञेश घोरपडे सातारा, अर्णव कुंचलवार नागपूर या खेळाडूंचा सहभाग होता. तर  मुलींच्या संघात नित्या बंग मुंबई, स्वरा बोरखडे नागपूर, आबा फाळके चंद्रपूर, मिष्का त्रिपाठी ठाणे, भूमी धगधगे नंदुरबार, त्विशा नोवीन मुंबई, अनिष्का बियाणी मुंबई, रिवा चरणकर सातारा या खेळाडूंचा सहभाग होता. 

स्पर्धेचा बक्षीस समारंभ पोदार इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या उपप्राचार्या मनीषा आमराळे, आयुर्विमा महामंडळाचे वरिष्ठ व्यवस्थापक राजेंद्र पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर धनंजय इनामदार, मुख्य पंच पुण्याचे नितीन शेणवी, पोदार स्कूलचे ॲडमिन सुरेश देसाई, क्रीडा समन्वयक संजय चिले व उदय पाटील, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव भरत चौगुले व निरीक्षक राजु सोनेचा, मुख्य स्पर्धा संयोजक मनीष मारुलकर, धीरज वैद्य, आदित्य आळतेकर व अमित मोदी उपस्थित होते. अभिजीत परब यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पुण्याचे आंतरराष्ट्रीय पंच नितीन शेणवी यांनी मुख्य पंच म्हणून काम पाहिले त्यांना करण परीट, आरती मोदी, सूर्याजी भोसले व रोहित पोळ यांनी सहाय्य केले. पोदार स्कूल व ज्यु.कॉलेजच्या प्राचार्या शिल्पा कपूर व त्यांच्या सहकार्यानी विशेष परिश्रम घेतल्यामुळे स्पर्धा यशस्वी झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button