उमेश महाजन | आवाज मराठी एरंडोल | दिनांक २८/८/२०२३
कानबाई उत्सव हा खान्देशातील प्रमुख उत्सव मानला जातो. जात, पात, धर्म बाजूला ठेवून हा उत्सव साजरा केला जातो. यानिमित्ताने लोक एकत्र येत सद्भावनेचा संदेश देतात. खान्देशात पिढ्यानपिढ्यापासून हा उत्सव सुरु आहे.
महाराष्ट्र राज्याला मोठी सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. राज्यातील प्रत्येक भागात त्या-त्या ठिकाणांनुसार वेगवेगळ्या प्रथा-परंपरा आणि वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात. त्याचाच एक महत्त्वाचा भाग असलेला खान्देश देखील आपल्या वेगळ्या परंपरा आणि उत्सवांसाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी संस्कृती आणि वारसा जपण्यासाठी अनेक सण उत्सव साजरे केले जातात.
यातील एक महत्त्वाचा उत्सव म्हणजे कानबाई उत्सव कानबाई ही खान्देशाची ग्रामदैवत असून प्रत्येक वर्षी दुसऱ्या श्रावण सोमवारी खान्देशात ग्रामदैवत कानबाई मातेचा उत्सवाची लगबग सुरु होते. खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.
या उत्सवासाठी प्रत्येक घरातील मंडळी ही एकत्र येऊन मोठ्या अभिभावेने कानबाई मातेची स्थापना करून कानबाई मातेला पुरणपोळी चा नैवेद्य दाखवून घराघरात हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात तसेच एरंडोल येथे दुसऱ्या श्रावण सोमवारी विसर्जन मिरवणूक काढण्यात येते विशेष आहे की विसर्जन मिरवणुकीत महिलावर्ग हे नाचत गाजत व फुगडी खेळत मोठ्या उत्साहाने विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाग घेत असतात तसेच गावातील सर्व कानबाई या एकत्रित अंजली नदीकाठी येऊन त्या ठिकाणी सांगता करण्यात येते. विशेष हे की कानबाई मातेचे हे नारळ पारंपरिक असून कित्येक वर्षानुवर्ष एकाच नारळाची पूजा खानदेशात केली जाते…