आत्माराम पाटील | आवाज मराठी, चोपडा | दिनांक २५/८/२०२३
चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील नुकतेच सहाय्यक फौजदार पदी पदोन्नती झालेले शिवाजी ढगू बाविस्कर (वय ५२ ) हे आज सकाळी चोपडा शहरात लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले गेले.
सविस्तर वृत असे की, तक्रारदार यांचे चुलत भाऊ व त्याच्या मित्र यांना दिनांक २३/८/२००२३ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन च्या हद्दीतील लासूर गावाजवळ पोलीसांनी रस्त्यावर त्यांची मोटार सायकल अडवून तुमच्या जवळ गांजा आहे. अशी खबर मिळाली आहे. तुम्ही पोलीस स्टेशन ला चला. असे सांगितले जर गांजा ची केस व मोटार सायकल सोडवायची असेल तर ७५ हजार रुपये आम्हाला द्यावे लागतील. असे सांगून तडजोडी अंती तक्रारदार यांचे नातेवाईकांकडून पहाटे ४ वाजता तीस हजार रुपये घेतले. व मोटार सायकल त्यांनी ठेवून घेतली. जर तुम्हाला आणखी वीस हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले.
त्यानंतर दिनांक २४/८/२०२३ रोजी तक्रारदार यांचे कडेस आलोसे यांनी गांजा ची केस न करण्यासाठी व मोटार सायकल सोडविण्यासाठी वीस हजार रुपयेची मागणी केली. व तडजोडी अंती पंधरा हजार रुपये स्वीकारण्याची पंचासमक्ष तयारी दर्शविली. त्या प्रमाणे आलोसे यांनी उर्वरित पंधरा हजार रुपये २५/८/२०२३ रोजी चोपडा शहरात स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सापळा सुहास देशमुख पोलीस उपअधीक्षक लाच प्रतिबंध विभाग, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल वालझाडे पोलीस निरीक्षक, सहाय्यक फौजदार दिनेश सिंग पाटील, पोलीस नाईक बाळू मराठे, पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने यांनी यशस्वी सापळा रचला