टीम आवाज मराठी, जळगाव | २१ ऑगस्ट २०२३
भविष्यकाळात चंद्रावर वसाहती उभारल्या जातील इतकी प्रगती अवकाश तंत्रज्ञानात मानव करणार आहे, असे प्रतिपादन खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी केले अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे आयोजित ‘अनुभूती चांद्रयान’ महोत्सवात ‘अपोलो ११ ते चांद्रयान ३’ या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर महावीर क्लासेसचे संचालक नंदलाल गादिया, विज्ञान तंत्रज्ञान लेखक जयदीप पाटील, अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी, खगोल अभ्यासक किशोर वंजारी उपस्थित होते.
पुढे बोलताना अमोल जोशी म्हणाले की, अपोलो 11 हे मानव जातीचे अंतराळातील सर्वात पहिले आणि यशस्वी उड्डाण ठरले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने चांद्रयान मोहिमेच्या माध्यमातून चंद्रावर पाऊल ठेवण्याचे ठरविले आहे. अवकाश क्षेत्रात भारताचे हे मोठे यश असेल. यातील पहिला यशस्वी टप्पा चांद्रयान ३ ठरेल यानंतर इस्रो तर्फे पुढील कालावधीत सूर्यासाठी मिशन आदित्य पाठविले जाणार आहे.
याप्रसंगी बोलताना प्राध्यापक नंदलाल गादिया म्हणाले की, अवकाश क्षेत्रात भविष्यात अनेक संधी आहेत आणि स्पर्धा देखील आहे. यासाठी स्पर्धेमध्ये वेळेला खूप महत्त्व आहे. शालेय वयात शिक्षणाला महत्त्व द्या. भौतिकशास्त्र, गणित, इंग्रजी यासह इतर विषयांनाही प्राधान्य द्या. अनुभूती शाळेने सुरू केलेला चांद्रयान महोत्सव एक आदर्श उपक्रम आहे असेही ते म्हणाले. हर्षा वाणी, वंदना मरकड यांनी सूत्रसंचालन केले. जयदीप पाटील यांनी समारोप केला.