राज्यमुंबई

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

आज संध्याकाळी ४ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार

टीम आवाज मराठी मुंबई प्रतिनिधि | २४ ऑगस्ट २०२३ | मराठी आणि हिंंदी चित्रपट तसेच मनोरंजन विश्वातील आपल्या उत्तम अभिनय कौशल्याचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे नुकतेच निधन झाले. त्या ८१ व्या वर्षांच्या होत्या. सीमा देव यांनी मराठी आणि हिंदी सिनेमात उल्लेखनीय अभिनयाची कामगिरी करून नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांनी जवळपास ८० हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये काम केले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार गेल्या जवळपास वर्षभरापासून त्या वयोमानानुसार आजारी होत्या. त्याशिवाय त्यांना अल्झायमर याप्रकारच्या आजाराचेही निदानही झाले होते. गेल्या काही काळापासून सीमा त्यांचा मुलां समवेत  यांच्यासोबत मुंबईतील वांद्रे याठिकाणी राहत होत्या. मुलगा अभिनवदेखील मनोरंजन विश्वात दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहेत. सीमा यांच्या पार्थिवावर गुरुवारी संध्याकाळी ४ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

सीमा देव यांचे माहेरील  नाव नलिनी सराफ असे होते. मुंबईतल्या गिरगाव मध्ये त्यांचे बालपण गेले. त्यांनी सिनेसृष्टीत प्रवेश केला तेव्हा दुर्गा खोटे, सुलोचना, ललिता पवार या अभिनेत्रींनी महिलांसाठी अभिनय क्षेत्रात वाट दाखवण्यास सुरुवात केली होती. मात्र तरीही सीमा देव यांच्यासाठी प्रवास सोपा नव्हता. समाजातील जनमाणसांवर मात करत त्या पुढे आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button