टीम आवाज मराठी प्रतिनिधि मुक्ताईनगर | २४ ऑगस्ट २०२३ | मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा येथे किरकोळ वादातून माय-लेकांना मारहाण करण्यात आली असून याप्रकरणी चार जणांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयिताविरोधात गुन्हा दाखल – फिर्यादी सायराबी सैय्यद लुकमान (४२, मुक्ताईनगर) यांच्या तक्रारीनुसार, वाल्मीक चौकामध्ये सोमवार, दिनांक २१ रोजी सकाळी ११ वाजता संशयितांनी हातातील लोखंडी रॉड व काठीने फिर्यादीसह त्यांचा मुलगा सैय्यद लुकमान वय २६ यांना जबर मारहाण करीत दुखापत करण्यात आली. याप्रकरणी वसीमखान शब्बीर खान, शेख रहेमान शेख उस्मान, मोहसीन खान शब्बीर खान, अक्रम खान रईस खान (सर्व रा.हरताळा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नाईक विजय पढार करीत आहेत.