जळगाव

आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी एरंडोलच्या विकासासाठी ५ कोटीची भर.

इतर शहरांप्रमाणे एरंडोल शहराचा देखील कायापालट व्हावा ही दूरदृष्टी - आमदार चिमणराव पाटील

टीम आवाज मराठी उमेश महाजन एरंडोल प्रतिनिधी  | दि १५ ऑगस्ट २०२३ | येथील  एरंडोल – शहराचा सर्वांगीण विकासासाठी आमदार चिमणराव पाटील हे सदैव प्रयत्नशील असतातच. त्यातच आता शहराच्या वैभवात भर घालणारी लोकाभिमुख विकासकामे करणे, शहरातील भाविक-भक्तांसाठी उपलब्ध असलेल्या मंदिर परिसरांचा विकास करणे, शहरात उद्भवणाऱ्या रोगराईंचा नायनाट होणेसाठी कचऱ्याचे व्यवस्थापन करणे, शहरातील महापुरुषांच्या चौकांचे सुशोभीकरण करणे, शहरातील छोट्या समाजांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे एकप्रकारे इतर शहरांप्रमाणे एरंडोल शहराचा देखील कायापालट व्हावा ही दूरदृष्टी आमदार चिमणराव पाटील यांची आहे. त्याच अनुषंगाने शहरात कोट्यावधींची कामे देखील आज प्रगती पथावर आहेत. त्यातील बरीचशी कामे ही आजपावेतो पूर्णत्वास देखील आलेली असून त्यांचा उपयोग नागरिक करीत आहेत.
शहराचा मुख्य प्रश्न म्हणजे पाणी.. यासाठी आमदार चिमणराव पाटील हे सातत्याने पाठपुरावा करीत होते. शहरात सुरु असलेल्या पाईपलाईनचे काम देखील आज पावेतो ५० टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यातच आता नव्याने ५ कोटीच्या विकासकामांची भर पडली आहे. यात आमदार चिमणराव पाटील यांच्या दूरदृष्टीने शहरातील छोट्या समाजासह दुर्गम भागाचा विकास करणे, आरोग्याबाबतची योग्य ती घाबरदारी घेणे हे आमदार चिमणराव पाटील यांचे मूळ ध्येयच आहे यात प्रामुख्याने शहरातील नाट्यगृह टप्पा-२ च्या बांधकामासाठी २.५० कोटी, एरंडोल शहरातील दक्षिणमुखी मारोती मंदिर परिसराजवळ सभामंडप बांधकामासाठी १५ लक्ष, एरंडोल शहरात घनकचरा व्यवस्थापनासाठी १ कोटी, एरंडोल शहरातील पुतळा परिसरांचा विकासासाठी १.२० कोटी, एरंडोल शहरातील खुल्या जागेत कुंभार समाजासाठी सामाजिक सभागृह बांधकामासाठी १५ लक्ष या कामांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button