चोपडा तालुक्यातील लासूर येथे कावड शोभायात्रा उत्साहात संपन्न
कावड यात्रेत महिलांनी व तरूण-तरूणींनी मोठ्या प्रमाणात सहभागी
टीम आवाज मराठी आत्माराम पाटील चोपडा प्रतिनिधी | दि १५ ऑगस्ट २०२३ | चोपडा तालुक्यातील लासूर येथील भाविकांनी श्री क्षेत्र नाटेश्वर महादेव मंदिरापासून काल संध्याकाळी कावड शोभायात्रेला सुरवात करण्यात आली होती. या कावड यात्रेत गावातील महिलांनी व विशेषतः तरूण-तरूणींनी यांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्यामुळे या शोभायात्रेला खरा आनंद प्राप्त झाला.
गेल्या तीन वर्षांनंतर पुरूषोत्तम मास म्हणजेच अधिक महिना आला होता. या निमित्ताने चोपडा तालुक्यातील लासूर येथील श्रीराम भजनी मंडळ, श्री अखंडानंद आश्रम आणि सर्व गावकर्यांच्या माध्यामातून एक महिना हरिनाम संकिर्ण किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील अनेक नामवंत कीर्तनकारांनी आपली कीर्तनाची सेवा दिली. याचे औचित्य साधून काल संध्याकाळी पाच वाजता श्री नाटेश्वर महादेव मंदिरापासून तर संपुर्ण गावात कावड आणि पालखी शोभायात्रा काढण्यात आली होती. हि शोभायात्रा यशस्वी साठी. ह. भ. प. बापू महाराज चौधरी,विणेकरी ह. भ. प. विश्वास महाराज,गायनाचार्य ह. भ. प. प्रकाश महाराज, वैभव जोशी, नंदू पाटील, विलास वाघ, विक्रम जावरे, भालचंद्र पाटील,अरूण पाटील, पिंटू महाजन, नेमिचंद पालीवाल,बाबूराव पाटील, राजेंद्र महाजन, वाल्मिक पाटील व श्रीराम भजनी मंडळाचे सर्व टाळकरींनी परिश्रम घेतले.