कोर्टात न्यायाधीशाच्या दालनातच आरोपीवर पोलिसांसमोर गोळीबार !
सातारा जिल्ह्यातील वाईच्या कोर्टातील थरारक प्रसंग; पोलीस कर्मचारी जखमी
टीम आवाज मराठी सातारा प्रतिनिधि | ७ ऑगस्ट २०२३| : राज्यातील भर न्यायालयात एका न्यायाधीशाच्या दालनात आरोपी वर गोळीबार झाल्याचा थरारक प्रसंग न्यायाधीश, वकिलांसह पोलिसांनी सुद्धा अनुभवला आहे. सदरहू घटना सातारा जिल्ह्यातील वाई येथील न्यायालयात घडल्याचे कळते.
हाती आलेल्या सविस्तर माहिती अशी कि, वाई येथील भर न्यायालयात न्यायाधीशांच्या दालनासमोर एका आरोपीवर गोळीबार झाल्याच्या घटनेने राज्यात मोठी खळबळ उडाली असून, या गोळीबारात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. याप्रकरणात १५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाई न्यायालयात मोका गुन्ह्याखाली कारवाई करण्यात आलेल्या कुख्यात गुन्हेगार अनिकेत जाधव यांच्यासह दोन साथीदारांवर हा गोळीबार झाल्याचे कळते. कोर्टात धरून असलेल्या एका आरोपींना हा गोळीबार केला असल्याची माहिती आहे. कोल्हापूरच्या कळबा मध्यवर्ती कारागृहात बंटी जाधव असताना त्यांना वाईमधील एका हॉटेल व्यवसायिकांकडून खंडणीची मागणी केली होती त्यामुळे वाई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी कडबा कारागृहात तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं तसेच त्यांना आज वाई कोर्टात सादर केले असता कोर्टात दबा धरून बसलेल्या एका आरोपीने बंटी जाधवसह त्याच्या दोन साथीदारांवर गोळीबार केला आहे.
सदर आरोपींवर दोन गोळ्या झाडण्यात आल्या असून एका आरोपीला पोलिसांना पकडण्यात यशस्वी झाले. या थरारक घटनेमध्ये एक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाला आहे. हा सर्व प्रकार न्यायाधीशांच्या दालनामध्येच त्यांच्यासमोरच घडली आहे, अशी माहिती सुत्रांनी पोलिसांच्या हवाल्यानं दिली आहे.