जळगाव

अमळनेरात आग विझवताना अग्निशमन कर्मचाऱ्यांना विजेचा धक्का

सुदैवाने जीवाने बचावले

टीम आवाज मराठी अमळनेर  प्रतिनिधि | ३ ऑगस्ट २०२३ | येथील अमळनेर शहरातील तिरंगा चौकातील दुकानास अचानक आग लागल्याने ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना दि ३१ जुलै रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडली. आग विझवताना अग्निशमन दलाच्या तिन्ही कर्मचाऱ्याना विजेचा धक्का बसला.  मात्र सुदैवाने त्यांचा जीव वाचला. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात  आगीची नोंद दाखल करण्यात आली आहे.

भाऊसाहेब गुलाबराव महाजन यांचे तिरंगा चौकात कांचन कॉस्मेटिक व जनरल स्टोअर्सचे दुकान आहे. दि  ३१ जुलै रोजी रात्री त्यांच्या  शेजारील दुकानदार हेमनदास पंजाबी यांचा फोन आला की आपल्या दुकानामधून धूर निघत आहे. भाऊसाहेब महाजन हे तात्काळ  दुकानावर पोहचले.  त्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उघडले असता मोठ्या आगीच्या ज्वाला निदर्शनास आल्या आणि त्या आगीचे रौद्र रूप पाहून अग्निशमन दलाला बोलविण्यात आले. अग्निशमन दलाचे कर्मचारी नितीन खैरनार, दिनेश बिन्हाडे, जफर खान, फारुख शेख, आनंदा झिम्बल, मच्छिंद्र चौधरी, परेश उदेवाल हे आग विझवत होते. त्यावेळी वीजपुरवठा बंद करण्यासाठी महावितरण कंपनीला फोन सुद्धा करण्यात आला होता.

आगीमध्ये विद्युत पुरवठा उघड्यावर पडल्याने त्या उघडया वायरवर पाण्याचा फवाराउडल्याने जास्त प्रमाणात स्पार्किंग झाले आणि नितीन खैरनार, दिनेश बिन्हाडे, मछिंद्र चौधरी या तिन्ही कर्मचाऱ्याना विजेचा धक्का बसला. आणि सुदैवाने त्याचे प्राण बचावले. त्यानंतर काही वेळात वीजपुरवठा बंद करण्यात आला व सगळी आग विझवण्यात आली. शेजारील दुकानातील साहित्य बाहेर काढण्यात आले. यंग एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की, आग विझवण्यासाठी तीन बंब बोलविण्यात आले होते. दुकानातील सर्व कॉस्मेटिक व प्लास्टिक साहित्य जळून ५० ते ६० हजाराचे नुकसान झाले. घटनास्थळी पोलिस निरीक्षक विजय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोळे, रवींद्र पाटील यांनी भेट दिली. अमळनेर पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. हि आग शॉर्टसर्किटने आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. सदर घटनेचा तपास हेडकॉन्स्टेबल संजय पाटील हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button