टीम आवाज मराठी पुणे प्रतिनिधि | १ ऑगस्ट २०२३ | : मंगळवारी पुण्यात संपन्न झालेल्या सोहळ्यात प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक पुरस्कार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात स्टेजवर विविध मान्यवर उपस्थित होते. त्यात भाजपा आणि नरेंद्र मोदीचे राजकीय कट्टर वैचारिक विरोधक शरद पवार हे देखील उपस्थित होते. गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली राजकीय फूट आणि बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काय बोलतील, याविषयी राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. त्यामुळे मोदींना पुरस्कार देण्यापूर्वी शरद पवार भाषणासाठी उभे राहिले त्यावेळी त्यांचे बोलणे ऐकण्यासाठी अनेकांचे कान उत्सुक झाले होते.
संपूर्ण भाषणात शरद पवार यांच्या भाषणाच्या शेवटी शरद पवार यांनी केवळ एका ओळीत नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत त्यांचे अभिनंदन केले. याव्यतिरिक्त शरद पवार मोदींविषयी जास्त काही बोलले नाहीत. टिळक पुरस्काराला विशेष महत्त्व आहे. याअगोदर लोकमान्य टिळक पुरस्कार हा इंदिरा गांधी, खान अब्दुल गफार खान, शंकर दयाल शर्मा, अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब देवरस, मनमोहन सिंह यांना मिळाला होता. या नेत्यांच्या रांगेत नरेंद्र मोदी यांचा समावेश झाला. त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो, असे शरद पवार यांनी म्हटले. त्याअगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करण्यात गेला. त्यामुळे या दोन भाषणांमधील चांगलीच चर्चा रंगली होती.
शरद पवार यांनी आपल्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या उल्लेखाने केली. शिवरायांचा जन्म आणि बालपण पुणे जिल्ह्यात गेलं. याचठिकाणी शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. हा पुण्याच्या गौरवशाली इतिहासाचा भाग आहे या देशात अनेक राजे होऊन गेले पण त्यांचं संस्थान त्यांच्या नावाने ओळखले जायचे. पण शिवाजी महाराजांनी उभारलेलं राज्य हे रयतेचं राज्य होतं, हिंदवी स्वराज्य होते. अलीकडच्या काळात या देशाच्या जवानांनी सर्जिकल स्ट्राईक केला होता, त्याची मोठी चर्चा झाली. पण लाल महालात पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवरायांच्या काळात झाला होता, अक्षय गोष्टी विसरता येणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.