
टीम आवाज मराठी, जळगाव : जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ मध्ये महायुतीच्या उमेदवारांनी प्रचाराचा मोठा धडाका लावला असून, गाडगे बाबा चौक आणि मोहन नगर परिसरात काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महायुतीचे उमेदवार प्रफुल देवकर यांच्यासह इतर उमेदवारांनी दौलत नगर, रामनगर, आणि गाडगे बाबा चौक या भागात घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या. या दौऱ्यादरम्यान ठिकठिकाणी महिलांनी उमेदवारांचे औक्षण करून आणि पुष्पहार अर्पण करून जंगी स्वागत केले, ज्यामुळे परिसरात विजयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रचार फेरीदरम्यान उमेदवारांनी स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. परिसरातील रस्ते, पाणी आणि सार्वजनिक सुविधांबाबत असलेल्या प्रश्नांवर चर्चा करून आगामी काळात विकासाचे व्हिजन नागरिकांसमोर मांडले. यावेळी महायुतीचे उमेदवार प्रफुल देवकर, सुरेखा नितीन तायडे यांच्यासह नितीन सपके, रोहिदास पाटील, मधुकर पाटील, दीपक भोसले, ललित देशमुख, अतुल जाधव, अमोल पाटील, रवि पाटील, धवल पाटील, तन्मय चौधरी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या जयघोषाने संपूर्ण प्रभाग दणाणून गेला होता.




