
जळगाव दि.18 प्रतिनिधी – जम्मू काश्मीर येथे सुरू असलेल्या ६९ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमीची राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती निकिता दिलीप पवार हिने १९ वर्ष आतील मुलींच्या ५५ किलो आतील वजन गटात कांस्यपदक पटकाविले, तिने पहिल्या फेरीत उत्तर प्रदेशची तमन्ना प्रजापती, दुसऱ्या फेरीत कर्नाटकच्या संजना सामंथा तिसऱ्या फेरीत दिल्लीची दिपीका हिला नमवत सेमी फायनल मध्ये प्रवेश केला. सेमी फायनल मध्ये लद्दाखची झारा बातुल हिच्या सोबत झालेल्या अतिशय चुरशीच्या लढतीत तिसऱ्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला आणि कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तिला तिथं अजित घारगे याचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. निकिता पवार ही डॉ. जी.डी. बेंडाळे महाविद्यालयाची विद्यार्थिनी असुन जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमीची खेळाडू आहे. तिच्या या यशाबद्दल जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, खजिनदार सुरेश खैरनार, सचिव अजित घारगे, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, महेश घारगे, सौरभ चौबे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमी चे अरविंद देशपांडे यांच्यासह सहका-यांनी




