जळगाव

मराठी शाहीर लोककला संमेलनात खान्देशातील लोककलांचा जागर..!

राष्ट्रशाहीर सिद्राम बसप्पा मुचाटे जीवनगौरव पुरस्कार रमेश कदम यांना प्रदान

जळगाव, दि. 4 (प्रतिनिधी) –: शाहिरी क्षेत्र संघटन, सार्वजनिक कार्य व पत्रकारिता अशा माध्यमातून ज्यांनी आपले आयुष्य साठ वर्षांहून अधिक काळ निरलस वृत्तीने समर्पित केले त्या अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे संस्थापक व मुख्य विश्वस्त श्री रमेश कदम यांना पहिला खान्देश रत्न’राष्ट्रशाहीर सिद्राम बसाप्पा मुचाटे जीवन गौरव पुरस्कार’ महाराष्ट्राच्या पारंपारिक लोकवाद्याच्या गजरात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

खान्देश लोककलावंत विकास प्रतिष्ठान जळगाव ह्या संस्थेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला असुन स्वरूप याचे रूपये ५१००० एकावन्न हजार,शाल, श्रीफळ, मानपत्र व सन्मानचिन्ह असे आहे,

अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद आणि खान्देश लोककलावंत प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने मराठी शाहीर लोककलाकार सम्मेलनाचे आयोजन जळगाव येथिल माजी सैनिक सभागृह, येथे करण्यात होते त्यात सदर पुरस्कार प्रदान स्मितोदय फाऊंडेशन च्या अध्यक्षा भैरवी पंलाडे-वाघ यांच्या शुभहस्ते व जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला
प्रारंभी राष्ट्र शाहीर सिद्राम बसाप्पा मुसाटे यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन भैरवीताई पलांडे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान प्रसिद्ध शाहीर व अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष डॉ शाहीर देवानंद माळी यांनी भुषविले तर संमेलनाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक व शाहीर परिषदेचे नवनिर्वाचित प्रमुख कार्यवाह शाहीर विनोद ढगे यांनी केले.

याप्रसंगी पुरस्कार प्राप्त श्री रमेश कदम यांनी शाहीर परिषदेच्या ३५ वर्षाच्या दैदिप्यमान कामगिरीचा आढावा घेताना शाहीर लोककलावंतांच्या न्याय हक्कासाठी लढलेल्या जनआंदोलनाची माहिती उपस्थितांना करून दिली.आता निरोपाची वेळ आली असून अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद या संस्थेची धुरा शाहीर देवानंद माळी व शाहीर विनोद ढगे सारख्या तळमळीने काम करणाऱ्या तरुणांच्या हातात देण्याची वेळ आलेली आहे आता मी शरीराने जरी थकलो तरी मनाने व शेवटच्या श्वासापर्यंत परिषदेची धुरा सांभाळणाऱ्या युवा पिढी च्या सोबत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

संमेलनाचे अध्यक्ष शाहीर देवानंद माळी यांनी शाहीर परिषदेचे काम जोमाने पुढे नेऊन शाहिरी लोककलेच्या जतन व संवर्धनासोबतच लोककलावंतांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी यापुढे प्रभावीरीत्या परिषद कार्यरत राहील अशी ग्वाही दिली.

या संमेलना ला राज्यभरातील विविध जिल्ह्यातील शाहीर परिषदेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यात प्रामुख्याने शाहीर भिकाजी भोसले शाहीर राणा जोगदंड शाहीर आसनगावकर शाहीर आप्पासाहेब उगले शाहीर धनवटे शाहीर खांदेभराड शाहीर अरविंद जगताप शाहीर आप्पा खताळ शाहीर विश्वास कांबळ नंदा पुणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच आभार प्रदर्शन खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे समन्वयक शाहीर सचिन महाजन यांनी केले
या संमेलनास खान्देशा सह राज्यभरातील मोठ्या संख्येने लोककलावंत उपस्थित होते या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी परिषदेचे मोहित पाटील संतोष चौधरी भिकाभाऊ धनगर आकाश भावसार अवधूत दलाल अरविंद पाटील गोकुळ चौधरी आदींनी परिश्रम घेतले.

शोभायात्रा..
********* मराठी शाहीर लोककला संमेलनाच्या निमित्ताने भव्य अशी लोककलेची शोभायात्रा काढण्यात आली काव्यरत्नावली चौका तील भाऊचे उद्यान येथे या शोभायात्रेचा प्रारंभ महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शाहीर शाहीर देवानंद माळी यांच्या हस्ते करण्यात आले भाऊंच्या उद्यानातील राष्ट्रध्वजा समोर देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध प्रकर लढा देणारा खान्देश रत्न राष्ट्रशाहीर सिद्राम बसपा मुचाटे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रारंभ झाला प्रारंभी खान्देश लोक कलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष शाहीर विनोद ढगे यांनी महाराष्ट्र गीत गायले व लोककलेच्या सादरीकरणा सह शोभायात्रे चा प्रारंभ झाला या शोभायात्रेत खानदेशातील शाहीर, वही गायन, वाघ्या मुरळी, गोंधळी, टिंगरी वादक, आधी विविध लोककला प्रकारातील लोककलावंतानी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आपल्या पारंपारिक लोककलेचे सादरीकरण करत ही शोभायात्रा माजी सैनिक सभागृह येथे पोहोचली व या ठिकाणी मुख्य संमेलनाला प्रारंभ झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button