पुण्यात तृतीयपंथीयांचे नितेश राणेंच्या विरोधात आंदोलन
पुण्यात तृतीयपंथीयांचे नितेश राणेंच्या विरोधात आंदोलन
टीम आवाज मराठी, मुंबई | १२ जुलै २०२३ | सध्या महाराष्ट्रात राजकीय नेते एकमेकांवर मोठ्या प्रमाणावर टीका करत असतात. राजकीय नेते बोलताना अतिशय खालच्या पातळीवर टीका करत असताना दिसत आहे. यामध्ये आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असताना ‘हे बघा हिजड्यांचे सरदार,’ असे वक्तव्य केले होते. यामुळे राज्यातील तृतीयपंथी आक्रमक झाले असून नितेश राणेंच्या विरोधात राज्यभर आंदोलन करत आहेत. पुणे येथील बंडगाडर्न पोलीस स्टेशन समोर तृतीयपंथी समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आला असून त्यांनी नितेश राणे यांच्या वर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे.
उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये देशपांडे सभागृहात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘नागपूरला लागलेला कलंक’ अस म्हणत अश्या प्रकारची जहरी टीका केली होती. उद्धव ठाकरे यांच्या या टिकेनंतर भाजपा नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्या विरोधात टीका होत आहेत. यातच भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना भाषेची पातळी सोडली आणि ठाकरे यांचा उल्लेख हिजड्यांचा प्रमुख असा केला आहे. ‘हे बघा हिजड्यांचे सरदार,’ म्हणून नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचा फोटो ट्विट केला आहे. त्यानंतर हा सगळा वाद राज्यभरात सुरू झाला आहे.