जळगाव

“रंग सपना : सानिका भन्साळींच्या रंगविश्वातून एक अविस्मरणीय प्रवास”

आज चित्र प्रदर्शनाचे पी. एन. गाडगीळ गॅलरीमधे उद्घाटन

जळगाव दि.19 प्रतिनिधी –जळगाव शहरातील कला प्रेमींसाठी एक छान चित्रप्रदर्शन पहायची व अनुभवायची संधी मिळणार आहे. प्रसिध्द चित्रकार सचिन मुसळे यांची विद्यार्थीनी सानिका भन्साळी हीचे ‘रंग सपना’ हे भव्य एकल चित्र प्रदर्शन पी. एन. गाडगीळ गॅलरीमधे आयोजित करण्यात आले आहे. दि. १९ जून गुरुवार रोजी सायं. ६ वा. या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या चित्र प्रदर्शनात सानिकाच्या मनातील विविध रंगांना व आकारांना तिने कॅनव्हासवर उत्तम पद्धतीने चितारले आहे. ते कलाप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे. तिने एक मनोहर विश्व रचले असून, तिच्या प्रत्येक ब्रशस्ट्रोकमध्ये चित्रकलेचे प्रेम आणि भावनांचा उलगडा प्रदर्शन पहाणा-याला होणार आहे.


आज गुरुवारी सायं. ६ वा या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जि.प. जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल , डॉ. इंद्राणी मिश्रा, परिवर्तनचे अध्यक्ष रंगकर्मी शंभू पाटील, किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या मीनल जैन, प्रसिद्ध चित्रकार सचिन मुसळे, पी.एन. गाडगीळचे प्रशासकिय अधिकारी गिरीश डेरे हे मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.

ही कलात्मक मेजवानी गौरव भन्साळी व नेहा भन्साळी यांच्या दूरदर्शी संकल्पनेतून साकारली गेली असून पी. एन. गाडगीळ अँड सन्स लिमिटेड यांचे सहकार्य या चित्र प्रदर्शनाला लाभले आहे. सानिकाच्या रंगसृष्टीतून प्रेक्षकांना नवा दृष्टिकोन आणि मनाला हलवणारा अनुभव मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. या प्रदर्शनातून कला आणि भावनांचा सुंदर संगम अनुभवण्यासाठी सर्वांनी यावे असे आवाहन गौरव भन्साली यांनी केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button