
टीम आवाज मराठी, जळगाव। ८ जुलै २०२३ । राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार यांनी येवल्यात पहिली सभा घेतली. शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात आपली ताकद दाखवली आहे. त्यांनी अजित पवार गटाला नाव न घेता सुनावले आहे.
यावेळी शरद पवार म्हणाले, अनेक संकटात काही सहकाऱ्यांनी साथ सोडली नाही. नाशिक जिल्ह्याने काय पुरोगामी विचारांना साथ दिली. मी आज इथ टीका करायला नाही, माफी मागायला आलो आहे. माझा अंदाज कधी चुकत नाही. मात्र इथ(छगन भुजबळ) माझा अंदाज चुकला.
लोकांसमोर जायची वेळ येईल तेव्हा पुन्हा येईल मात्र तेव्हा चूक करणार नाही. सध्या कांद्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. सामन्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारण करणार आहे. या मतदार संघाचा इतिहास मोठा आहे.
चुकीच्या गोष्टी घडल्या असतील तर दुरस्त केल्या पाहीजेत. मोदी यांनी राष्ट्रवादीवर हल्ला केला, आरोप केला. मी पक्षाच्या अध्यक्ष म्हणून सांगतो त्या आरोपांमध्ये तथ्य असेल तर नरेंद्र मोदी यांना माझे आव्हान आहे. तुम्ही सत्तेत आहात. सर्व सत्ता वापरा आणि चौकशी करा, कोणी भ्रष्टाचार केला असेल तर शिक्षा द्या. आमचा तुम्हाला पाठिंबा राहील, असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले, मी व्यक्तिगत बोलणार नाही. येवल्याचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आलो आहोत. काही लोक म्हणतात माझे वय झाले. वय झाले हे खरं आहे. वय ८२ झाले. पण गडी काय आहे तु पाहीलं कुठं?
उगाच वयाच्या उल्लेख करु नका. वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल. पुन्हा असा विचार करु नका, धोरणात्मक टीका करा. कामावर टीका करा. पण वैयक्तिक टीका करु नका. वय आणि वैयक्तिक हल्ला आम्हाला शिकवला नाही. यशवंतराव चव्हाण यांची ही शिकवण नाही, असे शरद पवार यांनी नाव न घेता अजित पवारांना सुनावले.