जळगाव

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा फाऊंडर्स डे उत्साहात

समतेतुन मानवतेची मुल्ये रुजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन दर्शन!

जळगाव दि. 20 प्रतिनिधी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव, शिक्षणाचा प्रवास, रमाबाईंसोबतचा विवाहप्रसंग, चवदार तळ्यासाठी केलेला महाड सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह, बाबासाहेब आणि संविधान, आम्ही भारताचे नागरिक संविधान अंगीकारत असल्याचा क्षण, बाबासाहेबांचे आर्थिक विकासाबाबात व शिक्षण आणि धर्माबाबतचे मानवता, बंधुत्व, समता यासाठी आपली कर्तव्य याबाबतचे विचार, संविधानाची महानता समानतेचा , स्वातंत्र्याचा, शोषणाविरुद्धचा, सांस्कृतिक व शैक्षणिकतेचा, धार्मिक स्वातंत्राचा, घटनात्मक उपाययोजनांचा हक्क, महिलांना सक्षमीकरणासाठीचे हिंदू कोड बिल यासह बाबासाहेबांचे जीवनाचे दर्शन विद्यार्थ्यांनी घडविले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित आदर्श समाज या विषयावर अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा फाऊंडर्स डे उत्साहात झाला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध कलागुण प्रदर्शित केले. यात नृत्य, वासुदेव, पिंगळा, भारुड, कीर्तन, पोवाडा,
नाटिका सादर केले. विक्रम वेताळ्याच्या गोष्टीतून बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रेरणादायी प्रवास उलगडून दाखविला. यावेळी विद्यार्थ्यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कला विभागातील विद्यार्थ्यांने बाबासाहेबाचे स्केच काढले.

छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिर येथे झालेल्या फाऊंडर्स डे ची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. अनुभूती स्कूलचे संस्थापक श्रध्देय भवरलाल जैन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल चे अध्यक्ष व जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. चे सह व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, कांताई नेत्रालयाच्या संचालिका डॉ. भावना जैन, रश्मी लाहोटी, अनुभूती निवासी स्कूल चे प्राचार्य देबाशिस दास यांच्यासोबत माजी विद्यार्थी उपस्थित होते.

माजी विद्यार्थीनी रागिणी झंजारे हिने मनोगत व्यक्त केले. व्यक्तीमत्व विकासात अनुभूती स्कूलचे स्थान मोलाचे आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा कुटुंबाचा सहवासात आदर्श माणुस घडविण्याचा शिकवण मिळाली.

यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

क्रीडा, शैक्षणिक, नृत्य यासह विविध क्षेत्रातील यशस्वी झालेल्या अनुभूती इंग्लिश मिडीयम प्रायमरी व सेकंडरी स्कूल च्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये रागिणी मधुकर झंजारे, पियूष वासुदेव राणे, यश शेखर शिंदे, धनश्री दत्तात्रय झिरमारे, मुकुंद शिवदा चौधरी, अश्विनी समाधान वरसोळे, मयूरी महाले, घोषीता पाटील, प्रतिक चंद्रशेखर सपकाळे, रुद्राक्ष माळी, शैलेश दीपक गोरे यांचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button