ठाणे (वृत्तसंस्था ) सर्वत्र भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला असून कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये नागरिक जखमी होत असल्याच्या घटना घडत असून नुकतीच ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथे 7 डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे. या घटेनेत मध्यरात्री चार भटक्या कुत्र्यांनी एका महिलेवर हल्ला केला. यात चारही कुत्र्यांनी महिलेचे लचके तोडत फरफटत नेले. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
त्यात रात्रीची वेळ असल्याने या रस्तावर कोणीच नव्हतं. कुत्र्यांनी या महिलेवर हल्ला करत तिला फरफटत देखील नेले. काही वेळाने सोसायटीतील सुरक्षारक्षक व इतरांच्या लक्षात ही बाब आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेत महिलेची कुत्र्यांपासून सुटका केली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे.
थरारक असा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कुत्र्यांच्या हल्ल्याची थरारक अशी ही घटना टिटवाळा येथील एका हाऊसिंग सोसायटीजवळ घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हयरल होत असून व्हिडिओत चार भटके कुत्रे एकामागून एक महिलेवर हल्ला करताना दिसत आहेत. नुसता हल्लाच करत नाही तर ही कुत्रे त्या महिलेला फरफटत नेत आहे. संबंधित महिला स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करताना दितस आहे. मात्र, या चार कुत्र्यांना प्रतिकार करणे तिला शक्य नसल्याचे दिसत आहे.