राज्यमुंबईराजकीय

वारकऱ्यांना मिळणार विमा संरक्षण

शिंदे सरकारची मोठी घोषणा

टीम आवाज मराठी । २१ जून २०२३ । महाराष्ट्राल मोठी धार्मिक परंपरा लाभलेली आहे. तर राज्यात नुकतीच आषाढी वारी सुरु आहे. दरम्यान, वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे.

पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना शासनातर्फे विमा संरक्षण देणारी योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्यावारकऱ्यांना शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र’ योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

या निर्णयामुळे लाखो वारकऱ्यांना शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येईल.

एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये देण्यात येतील.

वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळणार. वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो.

यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button