पाचोरा (प्रतिनिधी) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून पाचोरा येथे दुपारी ३ वाजता ते भडगाव रस्त्यावरील अटल मैदानात जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन आ. किशोर पाटील यांनी केले आहे.
राज्यात गेल्या अडीच वर्षांच्या काळात महायुती सरकारने अतिशय चांगले निर्णय घेऊन जनतेसाठी सेवा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करीत असताना सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी व सर्व समावेशक स्तुत्य निर्णय घेतले त्यमुळे असे लोकप्रिय झालेले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आता पाचोर्यामध्ये आज दिनांक १२ रोजी ३ वाजता अटल मैदानात आ. किशोर पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला येणार आहे. महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित द्यावी असे आवाहन आ. किशोर पाटील यांच्यातर्फे करण्यात आले आहे.